Nana Patole : विशाळगड हिंसाचारावरुन नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, 'गृहमंत्री दंगेखोरांना...'

Vishalgad Encroachment nana patole letter CM Eknath Shinde : दंगेखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळा, व कठोर कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
Nana Patole
Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

Nana Patole News : विशाळगड अतिक्रमणावरून राजकीय वाद पेटला आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमधील दंगलीमुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षडयंत्र करणाऱ्या दंगेखोरांना अद्दल घडवा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात एकाच धर्माच्या लोकांवर हल्ले करून त्यांच्या घरांची, दुकानांची व मालमत्तांचे प्रचंड नुकसान करण्यात आले. झुंडशाहीचा हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही, या दंगेखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळा, व कठोर कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

लाभासाठी हिंदु-मुस्लिम वाद

गेल्या काही दिवसांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यात हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत घातक व महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा आहे, असे पटोले Nana Patole यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

Nana Patole
Vishalgad News : शिवप्रेमी नावाखाली दंगल..., विशाळगडावरील हिंसाचारावर जयंत पाटलांनी सुनावलं; म्हणाले, "खुद्द शिवाजी महाराजांना…"

गृहमंत्री दंगखोरांना पाठीशी घालतात?

या प्रकरणी गृहमंत्री फडणवीस Devendra Fadanvis यांनी केलेले विधान राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वा दंगेखोरांवर कारवाई करण्यासंदर्भातील नसून विशिष्ट धर्माला भिती घालण्याचे व या प्रकरणाला वेगळा रंग देणारे आहे. गृहमंत्र्यांचे विधान हे एकप्रकारे दंगेखोरांना पाठीशी घालणारे आहे, आम्ही या विधानाचाही निषेध करतो. 14 जुलै रोजी जो हिंसाचार झाला ते सरकार आणि प्रशासनाचे फक्त अपयशच नाही तर प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

Nana Patole
Ambadas Danve News : 'पुढच्या आषाढीला उद्धव ठाकरे पांडुरंगाची पूजा करतील, अन् आम्ही..' ; अंबादास दानवेंचं विधान चर्चेत!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com