Car Burnt Case : ओबीसी नेत्याची कार जाळणाऱ्याला अटक, मनोज जरांगेंचा खास माणूस! थेट फोटोच वाघमारेंनी दाखवला

Vishwambhar Tirkhe Arrested : पोलिसांनी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार जाळणाऱ्याला अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा करण्यात आला आहे.
manoj jarange Navnath Waghmare
sarkarnamamanoj jarange patil Navnath Waghmare
Published on
Updated on

Navnath Waghmare News : ओबीसी आंदोलक, नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्यात आली होती. गाडी जाळणारा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव विश्वंभर तिरखे असं आहे. तिरखे हा मनोज जरांगे पाटील यांचा खास माणूस असल्याचा दावा नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बसलेला तिरखे याचा फोटोच वाघमारे यांनी दाखवला.

नवनाथ वाघमारे म्हणाले, 'जरांगेचा निकटवर्तीय तिरुके नावाचा माणूस आहे. मनोज जरांगेसोबत असल्याचा फोटो देखील आहे माझ्याकडे. जरांगेचा अत्यंत खास आणि जवळ आहे तो. नारायण गडावर ते दोघे गेले होते. तेव्हा तिथल्या महंताने दोघांच्या गळात एकच माळ टाकली होती.'

'जरांगे म्हणत होता असे आम्ही धंदे करत नाही. आम्ही 96 कुळी मराठे आहोत. जरांगेचा फक्त दंगल घडवण्याचा हेतू आहे. माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही, समाजाचे काम करायचे मी कधी बंद करणार नाही. पण जरांगेचे दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे.', असे देखील वाघमारे यांनी म्हटले.

आरोपाची कबुली...

तीन दिवसांपूर्वी नवनाथ वाघामारे यांची स्कार्पिओ गाडीवर डिझेल टाकून जाळण्यात आली होती. त्यानंतर जालना पोलिसांनी गुन्हा दाखला केला होता. सीसीटीव्हीमध्ये गाडी जाळणारा दिसत होता त्याआधारे पोलिसांनी विश्वंभर तिरुखे याला अटक केली. तिरखे याना गाडी जाळल्याचा गु्न्हा देखील कबुल केला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जामीन देखील मंजुर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com