Walmik Karad Update : मोठी बातमी : वाल्मिक कराडचा नवा Video समोर, PSI सह चाटे, घुलेही सोबत...

Santosh Deshmukh Murder Case Avada Extortion Case : आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडला सुरूवातीला अटक करण्यात आली होती.  
Walmik Karad Video
Walmik Karad VideoSarkarnama
Published on
Updated on

Walmik Karad Video : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा एकत्रित व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये वाल्मिक कराडही दिसत असल्याने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. आवादा कंपनीकडे ज्यादिवशी खंडणीची मागणी करण्यात आली, त्याच दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे.

सुरूवातीला खंडणीप्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने त्याला अटक केली. त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कराडसह विष्णु चाटे, प्रतिक घुले आणि सुदर्शन घुले दिसत आहे.

Walmik Karad Video
Shiv Sena: शिंदेंची सेना फुटीच्या मार्गावर? आग लागल्याशिवाय धूर निघणार नाही! शरद पवारांच्या खासदाराचे सूचक वक्तव्य

चौघांवरही खंडणीचा गुन्हा दाखल आहे. निलंबित पोलिस अधिकारी राजेश पाटील या फुटेजमध्ये दिसत आहेत. खंडणीप्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याबाबतचा पुरावा पोलिसांकडे नसल्याची चर्चा होती. पण आता हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने मोठा पुरावा मिळाल्याचे बोलले जात आहे.

केजमधील विष्णु चाटे याच्या कार्यालयात जात असतानाचे हे फुटेज आहे. विशेष म्हणजे अवादा कंपनीकडे ज्यादिवशी म्हणजे 29 नोव्हेंबरला खंडणी मागितली, त्याच दिवशीचे हे फुटेज असल्याचा दावा केला जात आहे. खंडणी मागण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. विष्णु चाटे याच्या मोबाईलवरून कंपनीकडे 2 कोटी रुपयांची खडणी मागण्यात आली होती, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

Walmik Karad Video
Manikrao Kokate Politics: कोकाटे बेधडक बोलले, "कोण लबाड हे मला कळते"

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली आहे. याप्रकरणी सुदर्शन घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळेसह आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांनी सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणाचा एसआयटी तपास करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com