Devendra Fadnavis : फडणवीस असे का म्हणाले ? 'यावेळचे मत भाजपकरिता नाही....'

Ramdas Tadas : पहिलवान रामदास तडस यांना मत म्हणजे मोदींना मत असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते चांदूर रेल्वे येथे भाजप नेते रामदास तडस यांच्या प्रचारात बोलत होते.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Wardha Lok Sabha Election 2024 : वर्धा येथील भाजप उमदेवार रामदास तडस यांना उद्देशून बोलताना फडणवीस यांनी तडस यांचा 'पहिलवान' असा उल्लेख केला. पहिलवान इतके हुशार आहेत, की मोदी आणि गडकरींकडून काम करून आणता. अतिशय चांगले काम रामदास तडस यांनी केले. बळीराजा संघर्ष समितीची बैठक झाली. आ. प्रताप अरसड यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची केलेली मागणी लवकरच पूर्ण करू, अशी ग्वाही फडणवीस यांनी येथे दिली.

कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना मदतीची तयारी राज्य शासनाची आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्य सरकार भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठी मदत करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. पुढील दीड वर्षात शेतकऱ्यांना सोलर फीडरच्या माध्यमातून बारा तास वीज दिवसा किंवा रात्रीतून देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे फडणवीस म्हणाले. या सभेत प्रताप अरसड यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी फोकस करत त्यांच्या मागण्यांना प्राधान्यांने सोडविण्याची ग्वाही का दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Amol Kolhe : 'आता दिल्लीचे तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा..!' अमोल कोल्हेंची डरकाळी

मोदी सरकारचा गेली दहा वर्षे ट्रेलर होते. पुढील पाच वर्षांत भारताला अशा ठिकाणी मोदी नेतील की मागे वळून पाहावे लागणार नाही. मोदींनी व्यवस्था उभी केली आहे. मोदींच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. कमळाचे बटन दाबल्याने रामदास तडस यांच्या मार्फत थेट मोदींना मतदान मिळते, असा दावा फडणवीस यांनी चांदुर रेल्वेच्या सभेत केला. धामद पुनर्वसन प्रकल्पासाठी आवश्यक ती मदत करण्यास शासन वचनबद्ध असल्याचे फडणवीस म्हणाले.

कापूस, सोयाबीनचे भाव का कोसळले ?

मोदींनी देशात किसान सन्मान निधी दिला. केंद्राचे व राज्याचे सहा असे एकूण बारा हजार शेतकऱ्यांना मिळत आहे. या वर्षी रशिया युक्रेन युद्ध, आखाती देशातील युद्धामुळे शेतमालाचे भाव कोसळले, सोयाबीन आणि कापसाचे भाव कोसळले, असा दावा फडणवीस यांनी केला. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभे राहणार आहे. भावांतर योजनेअंतर्गत चार हजार कोटी रुपये देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. आचारसंहिता संपल्यानंतर भावांतराचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे म्हणत फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आज केला.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली. सोळा हजार मेगावाॅट वीज ही शेतीकरता संपूर्ण महाराष्ट्रात लागते. हे सोळा हजार मेगावाॅट वीज सोलरवर नेण्याचं काम आम्ही सुरू केल आहे. नऊ हजार मेगावाॅटचे वर्कऑर्डर दिल्यात. सात हजार मेगावाॅटचा वर्कऑर्डर पुढच्या सहा महिन्यांत देण्यात येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यातून शेतकऱ्याला रोज बारा तास वीस 365 दिवस देण्याचा संकल्प फडणवीस यांनी केला.

त्यांना हरण्याची भीती म्हणून...

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना हरण्याची भीती दिसल्यावर ते संविधान बदलण्यात येणार असल्याची आरोळी ठोकतात, असा दावा फडणवीस यांनी केला. देशात कोणीच संविधान बदलणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. दलित, आदिवासी लोकांमध्ये विरोधक अप्रचार करत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बाबासाहेबांचे संविधान कमजोर नसल्याचे सांगत ते कदापि बदलण्यात येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

मतदानाबद्दल नेमके काय म्हणाले फडणवीस.....

'आपण ज्या वेळेस रामदास तडस यांना मतदान द्याल. कमळाचे बटन जेव्हा दाबाल. तेव्हा रामदासजींना मत मिळत नाही. तुमचं मत मोदीसाहेबांना मिळतं. मोदीसाहेबांना मत देण्याची संधी ही आपणाला मिळालेली आहे. या वेळचे मत हे भाजप करता नाही आहे. यावेळचे मत भारताकरिता आहे. भारताकरिता मतदान करण्याकरिता येत्या 26 तारखेला मतदान करा,' असे आवाहन फडणवीस यांनी केले.

R

Devendra Fadnavis
Imran Pratapgarhi News: मोदीजी बाय बाय...शायरी म्हणून ठीक, पण जमिनीवर नियोजन काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com