Pune News : सध्याच्या परिस्थितीत विचारांचा वारसदार असणं फार महत्त्वाचं आहे. देशाच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे. देशाने निर्णय घेतले. देशातलं वातावरण बदलत आहे. त्यामुळेच दिल्लीचेही तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे, असं खासदार अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी एका गावसभेदरम्यान वक्तव्य केलं आहे.
महाविकास आघाडीतील Mahavikas Aghadi राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ग्रामस्थांसोबत डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला. डॉ. कोल्हे Amol Kolhe म्हणाले की, अमरावतीचे भाजपचे BJP उमेदवारच सांगत आहेत की, पंतप्रधान मोदींची लाट आता राहिलेली नाही. हेच चित्र सगळ्या देशात आहे. दक्षिण भारत असो की ईशान्य भारतासह अनेक राज्यांत भाजप नाही.
या परिस्थितीत महाराष्ट्रतल्या माणसांची जबाबदारी मोठी आहे. आतापर्यंत आपण म्हणत होतो दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आता मात्र, दिल्लीचेही तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा, ही महाराष्ट्राच्या मनगटातली ताकद दाखवून द्यायची आहे, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केलं.
देश पातळीवरची निवडणूक असली तरी विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत. म्हणून ते वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करत आहेत. विरोधी उमेदवार सुरुवातीला म्हणाले, 2019 चा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवायची, आता वारं बदललं हे लक्षात आल्यावर म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. पण कोणाची पहिली निवडणूक असो किंवा शेवटची. त्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत. महागाई कमी होणार नाही, की हाताला काम मिळणार नाही. याचाही विचार मतदारांनी करावा, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.