Sanjay Raut News: संजय राऊतांना कोणता आजार झालाय? 3 महिन्यांपासून सुरु असलेल्या उपचारांवर पहिल्यांदाच बोलले

Sanjay Raut Cancer : काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या.
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut On his Cancer Battle : अनेक मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत सध्या गंभीर आजाराशी लढत आहे. तब्येत बरी नसल्याने ते काही काळ सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून लांब होते. ते पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा प्रयत्न करीत आहेत . संजय राऊत यांना नेमका कोणता आजार झाला आहे? याबाबत त्यांनी पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केले आहे.

काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून फडणवीसांपर्यंत अनेक नेत्यांनी राऊतांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

राऊत म्हणाले, "दिवाळीच्या दोन-तीन दिवसाआधी मला अचानक कॅन्सरचं निदान झालं. आपण अनेक दौरे करतो, दरम्यान अनेक दुखणं अंगावर काढतो. कुठेतरी काही खाण्यात किंवा झोपेत काही त्रास उद्भवला असेल, म्हणून आपण दुर्लक्ष करतो. मात्र माझा भाऊ आमदार सुनिल राऊत त्याला नेमकं काय समजलं आणि त्याने डॉक्टरांना बोलावून माझं रक्त तपासणी करून घेतली. त्यातून हे निष्पन्न झालं, कि मला पोटात कॅन्सर आहे,"

पोटाचा कॅन्सर कळाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे हसलो. कॅन्सर आहेचं तर आपण बघू. त्यावर मला उद्याचं दवाखान्यात ऍडमिट होण्यास सांगितलं. मात्र उद्याचं शेडूल असताना मी अचानक कसं काय ऍडमिट होईल? असं सांगितलं. मात्र भावाने आणि कुटुंबियांनी हट्ट धरून मला ऐन दिवाळीत ऍडमिट करायला सांगितलं.

या दरम्यान किमोथेरपी, रेडिएशन हे फार यातनादायी असतं. ते म्हणतात ना आजारापेक्षा उपचार भयंकर असं सगळं होतं. दीड महिना जवळजवळ मी बंदिस्त होतो. कधी घरी, तर कधी दवाखान्यात असायचो. खुप अडचणी होत्या, पाणीही पिता येत नव्हतं. मात्र त्यातून मी बाहेर निघायचा प्रयत्न करतोय, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Pune ZP Election: 'अरे बाबा ऐक' म्हणत ... बंडोबांना थंड करण्यासाठी अजितदादा करताहेत मनधरणी

शरद पवारांचा सल्ला

मी शरद पवारांना आजारपणाबाबत सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं किमोची सायकल घ्यावी लागेल. अमूक आहे, तमूक आहे. मग त्यांनी स्वत: काय केलं. डॉक्टर कोण? असं सगळं सांगितलं. शरद पवार म्हणाले, तुम्ही जेवढी हिंमत दाखवाल, तेवढे लवकर बरे व्हाल. हे हिंमतीवर असतं. तुम्ही जेवढी जास्त हिंमत दाखवाल. उभे राहाल. डिप्रेशनमध्ये जायचं नाही. त्यापद्धतीने मी उभा राहिलो. आणखी उपचार सुरु आहेत, काही शस्त्रक्रिया व्हायच्या आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com