Chandrakant Patil On Sanjay Raut : 'राऊतांना पाच रुपये कमवायचे माहीत नाही'; चंद्रकांत पाटलांनी फटकारलं

Chandrakant Patil criticism as Sanjay Raut talks about the financial condition of the state : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर केलेल्या विधानावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी फटकारले.
Chandrakant Patil On Sanjay Raut
Chandrakant Patil On Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना फटकारलं आहे.

"खोटे नरेटिव्हमध्ये आम्हाला मागे ढकलेल्या संजय राऊत यांना पाच रुपये कमवायचे माहीत नाही. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, तिजोरी कशी भरते, हे त्यांना माहीत नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे", अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना सुनावले.

राज्य सरकारने राज्यातील विविध विकासकामांचे 40 हजार कोटी रुपये थकवले असून, पगार थांबतील, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्यापाठोपाठ आमदार रोहित पवार यांनी याच मुद्यावरून खोचक टोमणे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावले.

Chandrakant Patil On Sanjay Raut
Chandrakant Patil On Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच हे योग्य नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

चंद्रकांत पाटील म्हणाले, "संजय राऊत खोटे नरेटिव्ह सेट करण्यात माहीर झाले. भाजप देखील त्यांनी मागे टाकलं आहे. संजय राऊत यांनी कधी पाच रुपये कमवण्याचे नाहीत नाही". महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, तिजोरी कशी भरते, हे त्यांना माहीत नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. लोकांच्या कल्याणासाठी ही योजना आहे. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Chandrakant Patil On Sanjay Raut
Vikas Thakre : ''मविआ'त आणि काँग्रेसमध्ये छुपे गद्दार'; विकास ठाकरे यांनी उडवली अनेक इच्छुकांची झोप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सुरू असलेल्या 'इनकमिंग'वरून चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. हे कालचक्र आहे. फिरत असते. राजकारणातच नाही, तर जिवंत माणसाच्या जीवनामध्ये कालचक्र असतात. 2019ला ही स्थिती आमची होती, हा आला, तो आला, तो आला, ही स्थिती आमची होती. पुष्कळ रांग लागली होती. पण विश्वासघाताने नंतर आमचे सरकार गेलं. सरकार जर गेल नसतं, तर औषध द्यायलाही शिल्लक राहीलं नसतं असे म्हणत सगळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी झाडून आमच्याकडे आली असती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

कालचक्र बदलत असतं, त्यामुळे ते आता बदलल आहे. त्यामुळे तिकडे रांग लागली आहे. दोन-चार दिवसांनी एखादी जर घटना घडली, तर इकडे पण रांग लागू शकते, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com