Mumbai News : शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवरून संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि महायुतीला टार्गेट करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका करताच, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना चांगलेच सुनावलं आहे.
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "संजय राऊतांना स्वतःच्या पगाराची चिंता आहे. संजय राऊतांना पगार ठाकरे (Uddhav Thackeray) देताहेत आणि चाकरी पवारांची करताहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची घोषणा होत नाही, त्यामुळे ठाकरे डोंगरात जातील, तपस्या करतील, मग राऊतांचा पगार कोण देणार?" मातोश्रीवरून संजय राऊतांना पगार मिळाला नाही, तर सिल्व्हर ओकवरून मिळेल, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.
राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर महाविकास आघाडीकडून महायुती सरकारवर हल्ले वाढले आहेत. सरकारकडून विकासकामांची बिलं थकवली आहेत. यावर संजय राऊतांनी टीका केली होती. त्याला शिवसेने (Shiv Sena) नरेश म्हस्के यांनी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा उद्देश. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार का थकले होते, असे जोरदार प्रत्युत्तर दिले.
कल्याण-डोंबिवलीमधील शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेत प्रवेश केला. या प्रवेशावर नरेश म्हस्के म्हणाले, काही लोकं त्यांच्याकडे गेले असतील. पण दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशाला किती लोकं हजर होती? असा सवाल केला.
नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या रूममधून काम करण्याच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्षलवादग्रस्त भागात बैठकीला जातात, याकडे लक्ष वेधत संजय राऊत यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रूममधून बसून मुख्यमंत्रीपदाचे काम चालवायचे. फेसुबकवरून बोलायचे, तुम्ही घरात बसलात, म्हणून तुम्हाला घरात बसावं लागलं, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला. आता मुख्यमंत्रीपदासाठी सोनिया गांधींच्या घराबाहेर मुजरा करण्याची वेळ आली आहे. लोटांगण घातले जात आहे, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.
संजय राऊत सत्तेसाठी पागल झाले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी त्यांना पगार दिला जातोय. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याची राऊतांनी सुपारी घेतली आहे. एकनाथ शिंदेंना धमक्या आल्या होत्या, तरी सुद्धा ते तिथे जाऊन पोलिसांना पाठींबा देताहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कधीच पोलिसांना गडचिरोलीला जाऊन भेटले नाहीत. नक्षल चळवळ महत्त्वाचा विषय आहे. देशाची आणि राज्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले आहेत. महायुतीत अजित पवार सहकारी आहेत. आम्ही तिघेजण एकत्र लढणार, असेही नरेश म्हस्के यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.