Maharashtra Lok Sabha News: शरद पवारांची फिफ्टी, फडणवीसांचं शतक; राहुल गांधी, मोदी अन् उद्धव ठाकरेंच्या किती सभा?

Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय नेते प्रचारात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं. तर या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात कोणत्या नेत्याच्या किती सभा झाल्या याबाबतची आकडेवारी जाणून घेऊया.
Rahul Gandhi, Sharad Pawar,  Uddhav Thackeray, Narendra Modi, Devendra Fadnavis
Rahul Gandhi, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Narendra Modi, Devendra Fadnavis

Maharashtra Lok Sabha Election 2024: पुढील पाच वर्ष देशात कोणाची सत्ता असणार ही ठरवणारी देशातील सर्वोच्च अशी मानली जाणारी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली. या प्रचारासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपल्या तब्येतीची पर्वा न करता देश पिंजून काढल्याचं दिसून आलं. तसंच यंदाच्या या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीत महाराष्ट्रात अनेक मोठ्यामोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या.

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या (Shiv Sena and NCP) फुटीचा फायदा आपणाला होणार असा दावा महायुतीकडून केला जात आहे, तर भाजपने (BJP) पक्षफोडी केल्याचा राग जनतेच्या मनात असल्यामुळे जनमत आमच्या बाजूने असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून (MVA) केला जात आहे. दोन्ही बाजूंनी काहीही दावे केले तर यंदाजी निवडणूक दोघांसाठीही सोपी नसल्याचा अंदाज राजकीय पक्षांना आला होता. यासाठीच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं यामध्ये कोणताच पक्ष मागे नव्हता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभेसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे. तर चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. उरलेल्या शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यातसाठीचं मतदान सोमवारी 20 मे रोजी मुंबईसह उपनगर व पालघरसह एकूण 13 मतदारसंघात मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचारांची सांगता झाली आहे. महाविकास आघाडी, महायुतीसह राज्यातील सर्वच लहान मोठ्या पक्षांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवली.

तर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय नेते प्रचारात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं. तर या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात कोणत्या नेत्याच्या किती सभा झाल्या याबाबतची माहिती जाणून घेऊया. लोकसभेचं मैदान मारण्यासाठी सर्वच नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचारसभा, रोड शो आणि रॅलीचा धडाका लावला होता. त्यामध्ये, दिग्गज नेत्यांनीही हजेरी लावली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात दीडपट सभा घेतल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी 8 एप्रिल रोजी चंद्रपुरात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठीची पहिली सभा घेतली. त्यानंतर, त्यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह राज्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. तर मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उपस्थित मोदींची शेवटची सभा पार पडली. मुंबईतील प्रचारसभेसह मोदींनी राज्यात एकूण 18 सभा घेतल्या. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घेणारे राष्ट्रीय नेते म्हणून मोदींचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. तर मोदी यांच्या खालोखाल अमित शहांच्या (Amit Shaha) राज्यात 7 सभा घेतल्या आहेत.

Rahul Gandhi, Sharad Pawar,  Uddhav Thackeray, Narendra Modi, Devendra Fadnavis
Jalna Lok Sabha Analysis : 'मिशन 45'मध्ये जालना आहे का? रावसाहेब दानवेंच्या 'या' दाव्यानंतर आकडेमोड सुरू

फडणवीसांचं शतक तर पवार 'पचास पार'

महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांमध्ये सर्वाधिक सभा घेण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आगाडीवर आहेत. फडणवीसांनी तब्बल शंभराहून अधिक सभा घेत मतदारांना महायुतीला मतदान करण्याची साद घातली. त्यांनी एकूण 115 सभा घेतल्या. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही शंभरी पार केली. तर राज्यातील वरिष्ठ नेते असणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साठ पेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत.

तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) 48 सभा घेतल्या. तर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीसहून अधिक सभा घेतल्या. तर लोकसभेच्या प्रतारासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 4 सभा गाजवल्या.

Rahul Gandhi, Sharad Pawar,  Uddhav Thackeray, Narendra Modi, Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal Politics : '...म्हणून नाशिकच्या दोन्ही जागा महायुती जिंकणार' ; छगन भुजबळांचा दावा!

इंडिया आघाडीचा भाग असणाऱ्या महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात काँग्रेससह आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी अनेक सभा घेतल्या. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 2 तर, राहुल गांधी व प्रियंका गांधी (Rahul Gandhi) यांनीही महाराष्ट्रात 2 जाहीर सभा घेतल्या. राहुल गांधींनी सोलापूर व पुणे येथे जाहीर सभा घेतल्या. नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात एक सभा घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल करत आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे आता या सर्व नेत्यांच्या सभांनंतर राज्यातील जनता कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com