Jalna Lok Sabha Analysis : 'मिशन 45'मध्ये जालना आहे का? रावसाहेब दानवेंच्या 'या' दाव्यानंतर आकडेमोड सुरू

Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे यांनी गेली निवडणूक तब्बल 3 लाख 37 हजारांच्या मताधिक्याने जिंकली होती. मराठा आरक्षणाचा परिणाम झाला तरी ते लाखभर मताने निवडून येतील
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

Jalna Political News : मराठा आरक्षणाच्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. महायुती राज्यात 45 जागा जिंकणार असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी पंढरपूरात केला. यावर दानवे यांनी दावा केलेल्या 45 जागांमध्ये जालना असणार का? असा खोचक सवाल विरोधकांकडून केला जातोय. जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांनी सलग सहाव्यांदा निवडणूक लढवली. Raosaheb Danve News

याआधीच्या पाच निवडणुकीत दानवे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. मराठा आरक्षण लढ्याचे केंद्रबिंदू ठरलेल्या जालन्यात मनोज जरांगे Manoj Jarange इफेक्ट मोठ्या प्रमाणात जाणवल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातोय. रावसाहेब दानवे यांनी गेली निवडणूक तब्बल 3 लाख 37 हजारांच्या मताधिक्याने जिंकली होती. मराठा आरक्षणाचा परिणाम झाला तरी ते लाखभर मताने निवडून येतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.

महाविकास आघाडीचे कल्याण काळे Kalyan Kale यांनी यावेळी जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांना तगडी फाईट दिली असून तेच निवडून येणार, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. यासाठी जालना लोकसभच्या सहाही विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची आकडेमोड, कोणी काम केले, कोणी विरोधात केले या सगळ्या गोष्टीचीं गोळाबेरीज दानवे आणि त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे.

13 मे रोजी मतदान झाल्यानंतर दानवे Raosaheb Danve मुंबईत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले होते. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपून उद्या प्रत्यक्षात मतदान होणार आहे. त्यामुळे दानवे यांनी शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर येथे जाऊन देवदर्शन घेतले. पंढरपूरात त्यांनी राज्यातील मतदान पार पडलेल्या आणि उद्या होऊ घातलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट केली.

Raosaheb Danve
Harshvardhan Jadhav News : हर्षवर्धन जाधव निवडणुकीनंतर आईला घेऊन काश्मिर सहलीवर...

दानवे यांच्या दाव्यानुसार लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा कुठलाही परिणाम झालेला नाही. त्यामुळे महायुती 45 जागा जिंकणार असे त्यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडीच्या खात्यात फक्त तीन जागा जाणार आहेत. दानवे यांच्या या दाव्यानंतर महायुतीच्या 45 जागांमध्ये जालना मतदारसंघाची जागा आहे का? असा खोचक सवाल केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दानवे यांच्याविरोधात मतदारसंघात सुप्त लाट होती, त्यामुळे कल्याण काळे यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि ते निवडून येणार, अशी चर्चा होताना दिसते आहे. अपक्ष उमेदवार मंगेश साबळे Mangesh Sable यांनी अपेक्षित मत घेतली नसल्याने मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून असलेल्या रोषाचा थेट फायदा कल्याण काळे यांना होणार असल्याचे बोलले जाते.

Raosaheb Danve
Sanjay Jadhav News : पक्षाशी एकनिष्ठ राहिलो म्हणून तिसऱ्यांदा उमेदवारी, अन् आता विजयी पण होणार..

दानवे यांचे विश्वासू मित्र मंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar, शिवसेना शिंदे सेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी महायुती असून काम केले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असतांनाही रावसाहेब दानवे यांचा आत्मविश्वास दांडगा असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com