Sharad Pawar: राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाले; "घरातील सुनेला..."

Lok Sabha Election 2024: "राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार (Sharad Pawar) यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात."
Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar: 'राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? सगळे राम मंदिराबाबत बोलतात, पण सीतेच्या मूर्तीबद्दल कोणीच बोलत नाही,' अशी तक्रार मला काही महिलांनी केल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे, तर पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट करत पवारांवर टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये बावनकुळेंनी लिहिलं, "राम मंदिरात (Ram Mandir) सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं.

राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत, पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल," अशा शब्दांत बावनकुळेंनी त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar
Loksabha Election : 'एकही शब्द वाईट बोलले नाही...' सुनेत्रा पवारांचा रोख कुणाकडे?

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

राम मंदिराच्या मुद्द्याबाबत बोलताना शरद पवारांनी एका बैठकीतील प्रसंग सांगितला. या वेळी ते म्हणाले, एका बैठकीमध्ये माझ्यासमोर महिलांनी विषय काढला. त्यांनी माझ्याकडे तक्रार केली की, राम मंदिराबाबत सर्वजण बोलताय, सीतेच्या मूर्तीबाबत का बोलत नाहीत, असं महिला म्हणाल्याचं पवारांनी सांगितलं.

पवारांच्या या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे. घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा? असा प्रश्न उपस्थित करत. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत, त्यामुळे त्यांनी राम मंदिराबाबतची माहिती घ्यावी, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना दिला आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com