Loksabha Election : 'एकही शब्द वाईट बोलले नाही...' सुनेत्रा पवारांचा रोख कुणाकडे?

Sunetra Pawar : कोणी कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही. एकही शब्द आजपर्यंत वाईट बोलले नाही आणि यापुढेही बोलणार नाही, असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawar sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करत सुनेत्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर फेसबुकवर पोस्ट करत सुनेत्रा पवारांनी आपल्याला विजयाची खात्री असल्याचे म्हटले आहे. शिवाय कितीही हल्ला केला तरी विचलित होणार नाही, असे आव्हान नाव न घेता सुप्रिया सुळे यांना दिले.

Sunetra Pawar
Baramati Lok Sabha Constituency: बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून प्रचारप्रमुखांची नावे जाहीर!

'या महासभेने एक सिद्ध केलं. ते म्हणजे कोणी कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही. एकही शब्द आजपर्यंत वाईट बोलले नाही आणि यापुढेही बोलणार नाही. मी विकासाचा कार्यक्रम घेऊनच जनतेसमोर गेले आणि यापुढेही जाईन,' असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

'उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पार पडलेल्या या महासभेने मला बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या विजयाचा विश्वास अधिकच भक्कम केला, बळकट केला, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

महायुतीचे शक्तिप्रदर्शन

सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला. त्या पूर्वी जाहीर सभा घेत महायुतीने शक्तिप्रदर्शन केले.

R

Sunetra Pawar
Patole on Pawar Family : भाजपनं पवारांच्या घरात भांडण लावलं; नाना पटोलेंचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com