त्यांनी भुंकायचे आणि यांनी धावत सुटायचे : ईडीच्या कारवाईवरून अरविंद सावंतांची भाजपवर टीका

‘ईडी’चे कार्यालय हे भाजपचे उपकार्यालय झाले आहे.
Arvind Sawant
Arvind Sawant Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी खासदार आनंद अडसूळ यांच्यावरील सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे. या करवाईनंतर शिवसेनेने भाजप आणि ‘ईडी’वर जोरदार हल्लाबोल केला. ‘त्यांनी भुंकायचे आणि यांनी धावत सुटायचे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अडसूळ यांच्यावरील कारवाईचा समाचार घेतला. ‘ईडी’चे कार्यालय हे भाजपचे उपकार्यालय असल्याची बोचरी टीका सावंत यांनी केली. परिणामी, राज्यात 'ईडी'च्या कारवायांमुळे राजकीय घमासान सुरू झाले आहे. (Arvind Sawant criticizes BJP over ED's action)

बँक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत अडसूळ यांना 'ईडी'ने समन्स बजावले आणि त्यानंतर मुंबईतील त्यांच्या घरी ताब्यात घेतले. त्यांची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयांत हलविण्यात आले. ही कारवाई होताच सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. अडसूळ यांच्यावरील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईनंतर ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Arvind Sawant
मला आज लहान भाऊ राजीव सातवांची आठवण येतेय : बिनविरोध निवडीनंतर रजनी पाटील भावूक

सावंत म्हणाले, ‘‘ईडीच्या कारवाया रोज होत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे मूल्य राहिलेले नाही. गेल्या ५० वर्षांत एवढे घडले नाही, ते आता घडत आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे सत्ता हे साधन आहे, साध्य नाही, याआधी भावना गवळी यांनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थेतील गैरव्यवहाराची तक्रार दिली आहे. त्यामुळे गवळी यांचा या प्रकरणाशी संबंध नाही." गुजतरामध्ये अमली पदार्थ सापडले, पुढे काय झाले, असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित करीत, भाजपच्या कारभारासोवती संशय असल्याचे सूचित केले.

Arvind Sawant
मामा आणि भाचेजावयांमध्ये पुन्हा रंगणार सामना

राज्यातील सरकार स्थिर झाले आहे. भाजप नेत्यांना सत्तेशिवाय जमत नाही. त्यावरून ते आता नैराश्याच्या गर्तेत फसले आहेत. त्याच्या रागातून भाजप 'ईडी'च्या कारवायांचा सपाटा लावत आहेत. ज्या प्रकरणांत कोणाचा काही संबंध नाही, अशा प्रकरणात विनाकारण अडकाविण्याचा प्रयत्न होत आहे, यातून लोकांना नेमके काय आहे, ते कळते आहे, असेही सावंत यांनी सांगितले. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार आणि त्यातून पुढे आलेला न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अडसूळ यांच्यावर ही कारवाईचा केल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com