Nagpur Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली! 16 डिसेंबरपासून नागपुरात होणार सुरू

Rahul Narvekar News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली घोषणा; विदर्भास असणार विशेष अपेक्षा
Rahul Narvekar
Rahul Narvekarsarkarnama
Published on
Updated on

Winter session of the Legislative Assembly : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यानंतर आता विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. याबाबतच्या तारखेची घोषणा केली गेली आहे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबर पासुन सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे.

या अधिवेशनात आमदारांचे शपथिविधी, राज्यपालांचे अभिभाषण इत्यादी पार पडले. सध्या मुंबईत राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेश सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश हे नागपुरात होत आहे. हे अधिवेशन आठवडाभर असेल. 12 डिसेंबरपासून सचिवालय तर 15 डिसेंबर पर्यंत संपूर्ण सरकार नागपूरमध्ये दाखल होईल.

नागपूरमध्ये अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्र्याच्या निवासस्थानांबाहेर नवीन नेमप्लेट लावणे सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरही नवीन नेमप्लेट बसवण्यात आली आहे. ज्यामधअये एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे(Eknath Shinde) असे लिहिले गेले आहे. त्यांना देवगिरी बंगला देण्यात आलेला आहे.

Rahul Narvekar
Raju Shetti Warning News : '...तर एकेएकाला जोड्यानं हाणू', राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा!

विदर्भाची अनेक प्रश्न या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. याशिवाय यंदा मुख्यमंत्रीही विदर्भातीलच असल्याने विदर्भातील जनतेसह लोकप्रतिनिधींनाही विशेष अपेक्षा असल्याचं बोललं जात आहे. विदर्भातील प्रश्न सुटावेत त्याबाबत चर्चा व्हावी यासाठी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते.

दरम्यान आज महाराष्ट्र सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मताने मंजूर झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रसचे दिलीप वळसे-पाटील, भाजप(BJP) आमदार संजय कुटे आणि आमदार रवी राणा यांनी सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला होता. यावेळी आवाजी मताने विश्वास दर्शक ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास करत आहे, अशा पद्धतीनं हा ठराव मांडण्यात आला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com