Raju Shetti Warning News : '...तर एकेएकाला जोड्यानं हाणू', राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा!

Raju Shetti Warned to Sugar factory owner : यंदाच्या हंगामात ऊसाला प्रति टन पहिली उचल 3700 मिळावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Sugar factory owner and Farmers organizations Meeting : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज(सोमवार) ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी साखर कारखानदार, प्रशासन आणि शेतकरी संघटना यांची बैठक बोलवण्यात आली होती. पण या बैठकीकडे कारखानदार आणि व्यवस्थापकांनी पाठ फिरवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले.

या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला. साखर कारखानदार ऊस दराबाबत गांभीर्याने दखल घेत नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांची मस्ती उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाही. तर बैठकीला येत नसतील तर एकेकाला जोड्याने हाणू, आता सज्जड दम शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी(Raju Shetti) यांनी दिला.

यंदाच्या हंगामात ऊसाला प्रति टन पहिली उचल 3700 मिळावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत दुभंगलेल्या शेतकरी संघटना एकत्र येत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आक्रमक होत आहेत. आंदोलनाच्या रेट्यामुळे साखर कारखानदार शेतकरी संघटनांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. मात्र या बैठकीत काही चेअरमन आणि कारखानदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी संघटनांनी या भूमिकेबाबत निषेध व्यक्त केला.

Raju Shetti
Rohit Patil : ''अमृता'हुनी ही गोड नाम तुझे 'देवा''; आर. आर. आबांच्या लेकाचा भाषणातून टोला, फडणवीसांना हसू अवरेना... पाहा VIDEO

गेल्या अनेक दिवसांपासून ऊस दरांसाठी विविध शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलन सुरू असताना साखर कारखानदारांना ऊस गाळप करण्याची परवानगी दिली आहे. पण कारखानदार दर ठरवत नसतील तर सुरू असलेले साखर कारखाने बंद करण्याची आमच्या हिंमत आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून दराबाबत आंदोलन सुरू असुनही कारखानदार बैठकीला येत नसतील तर त्यांची मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही" असा इशारा शेट्टी यांनी दिला.

Raju Shetti
Eknath Shinde: आठवलेंच्या खास शैलीत शिंदेंची सभागृहात तुफान टोलेबाजी; पटोलेंना चिमटा VIDEO पाहा

येत्या दोन दिवसांत पुढील बैठक -

कारखानदार आणि संचालकांनी ऊस दर बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार आजची बैठक स्थगित करण्यात आली. येत्या दोन दिवसांत पुन्हा नोटीस काढण्यात येईल आणि बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात येईल. अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com