Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मे महिन्याचा 1500 'या' दिवशी खात्यात जमा होणार?

Ladki Bahin Yojana May Month Installment : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
Ladki Bahin Yojana News
Ladki Bahin Yojana NewsSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात. मात्र, मे महिन्याच्या अखेर येत असतानाही अजूनही या योजनेतील बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी 1500 रुपयांच्या हप्ता कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत.

त्यातच, लाडकी बहीण (ladki Bahin Yojana) योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यासाठी सरकारने आदिवासी विकास विभागाचा तब्बल 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळवून महिला व बालविकास विभागाकडे दिला आहे.

मे महिन्याचा शेवट जवळ आल्याने, येत्या 5 दिवसांतच हा हप्ता म्हणजेच 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याकडून याबाबत माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

Ladki Bahin Yojana News
Top Earning World Leaders : पगाराच्या बाबतीत कोण आहे नंबर वन? जगातील टॉप नेत्यांची यादी

जर मे महिन्याचा हप्ता वेळेत जमा झाला नाही, तर मे व जून दोन्ही महिन्यांचे 1500+1500 असे एकत्रित 3000 रुपयेही जमा होण्याची शक्यता आहे.

सध्या सरकारकडून निधीची तजवीज करण्यात आली असून, महिला वर्गाकडून यावर मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवले जात आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारखेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com