Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात वाढणार 'महिलाराज'; पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार ?

Women Dominance in politics of Maharashtra : महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा महाराष्ट्राने आधीच केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : महिलांना विधानसभेत ३३ टक्के आरक्षणाचा कायदा झाला, तर महाराष्ट्रात किमान ९५ महिला आमदार असतील. सध्या ही संख्या २५ अशी आहे. याचा अर्थ विधानसभेतील महिलाराज आजच्या तुलनेने जवळपास चौपटीने वाढेल. मात्र, यानिमित्ताने आतातरी राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल काय, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा महाराष्ट्राने आधीच केला आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के महिला राज आधीपासूनच आहे. आता ३३ टक्के महिलाराज विधानसभेत दिसेल. या बदलामुळे काही प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Maharashtra Politics
Nana Patole On Modi : " मोदी नावाचा प्रभाव झाला कमी, पुन्हा एकदा देशात..."; काँग्रेसच्या पटोलेंचा खतरनाक कॉन्फिडन्स

दबाव वाढणार -

- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सातत्याने निवडून येत असलेल्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांना वा पुरुष मक्तेदारीमुळे संधी न मिळालेल्या महिलांसाठी आता विधानसभेचे दार कायद्याद्वारे उघडले जाईल.

- राज्यात महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. महिला आमदार ९५ झाल्या, तर त्यासाठी दबाव वाढेल.

- २०१९ नंतर राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर या कॅबिनेट तर आदिती तटकरे या राज्यमंत्री होत्या. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यावर आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या.

Maharashtra Politics
Sonia Gandhi On Women Reservation : 'महिला आरक्षणावर' सोनिया गांधी मांडणार काँग्रेसची भूमिका; मित्रपक्षांची अडचण होणार ?

महिला खासदारांची संख्या -

सध्या राज्यात भावना गवळी, सुप्रिया सुळे, पूनम महाजन, हीना गावित, रक्षा खडसे, प्रीतम मुंडे, भारती पवार आणि नवनीत कौर अशा आठ महिला खासदार आहेत. ३३ टक्के आरक्षणामुळे ही संख्या १६ होईल.

'या' आहेत महिला आमदार -

विद्या ठाकूर, सीमा हिरे, सुमनताई पाटील, भारती लव्हेकर, मंजुळा गावित, वर्षा गायकवाड, मंदा म्हात्रे, माधुरी मिसाळ, यामिनी जाधव, लता सोनवणे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, यशोमती ठाकूर, श्वेता महाले, नमिता मुंदडा, प्रतिभा धानोरकर, मेघना बोर्डीकर, अदिती तटकरे, प्रणिती शिंदे, गीता जैन, सरोज अहिरे, सुलभा खोडके, मनीषा चौधरी, अश्विनी जगताप, ऋतुजा लटके अशा २५ महिला विधानसभा सदस्य आहेत. मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २० महिला विजयी झाल्या होत्या.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com