Vote Chori : यशोमती ठाकूरांनी 'मत चोरी'वरून भाजप, निवडणूक आयोगाला डिवचले; नरेंद्र मोदी, ज्ञानेश कुमारांचे पोस्टर केले रिलीज, दिले खास कॅप्शन!

Yashomati Thakur Narendra Modi Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपानंतर यशोमती ठाकूर यांनी थेट निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी हे पोस्टर रिलीट करत सत्य पाहाण्याचे आवाहन केले आहे.
Yashomati Thakur launches poster campaign against PM Modi and Election Commission
Yashomati Thakur launches poster campaign against PM Modi and Election Commissionsarkarnama
Published on
Updated on

Yashomati Thakur News : राहूल गांधी यांनी केलेल्या ‘मत चोरी’च्या गौप्यस्फोटानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ‘द, ECI फाईल्स’ असे सिनेमा स्टाईलमध्ये पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत ‘रिलीज झाला आहे, सत्य घटनेवर आधारित ! प्रत्येकाने जरुर बघा, आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा !', असे कॅप्शन देत निवडणुक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपावरुन सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या मतदारांचे नाव निवडणूक यादीतून डिलिट केले जात असल्याचे पुराव्यानिशी दाखवले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘द ईसीआय फाईल्स’ या शिर्षकाचे एक सिनेमा स्टाईल पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकांऊंटवर पोस्ट केले आहे.

मागील दोन तीन वर्षांत राजकीय भाष्य करणारे द ताश्कंद फाईल्स, द काश्मिर फाईल्स, द केरला फाईल्स, द बंगाल फाईल्स असे चित्रपट प्रदर्शित झाले. हे चित्रपट भाजपच्या राजकीय विचारधारेला खतपाणी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून झाले. याचाच धागा पकडत यशोमती ठाकूर यांनी आता निवडणूक आयोगावर राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर द ईसीआय फाईल्स अशा नावाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

ज्ञानेश्वर कुमार, मोदी, शहांचे फोटो

ठाकूर यांनी आपल्या ट्विवटरून शेअर केलेल्या पोस्टवर केंद्रीय निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो आहेत तर, तर राहूल गांधी यांचा संविधान हातात घेतलेला फोटो प्रोटोगॉनिस्ट म्हणून वापरला आहे. अ फिल्म बाय नॅशनॅलिस्ट प्रोडक्शन असे देखील त्यावर लिहिलेले आहे. तसेच ‘THE E.C.I. FILES’ प्रत्येकाने जरुर बघा, आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा ! असे कॅप्शन देखील लिहीलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com