Rohit Pawar News : हीच ती योग्य वेळ! ZP निवडणुकांचा प्रचार संपण्याआधीची रोहित पवारांची पोस्ट चर्चेत, अजितदादांचा फोटो अन्...

ZP elections 2026 : पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आघाडी केली आहे.
Ajit Pawar Rohit Pawar
Ajit Pawar Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar social media post : राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपली. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्देवी निधनाने पवार कुटुंबासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या महानगरपालिका आणि त्याआधीच्या नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये अजितदादांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. विमान अपघाताच्या दिवशीही त्यांच्या प्रचारसभा होत्या.

अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आता ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा गुरूवारी थंडावल्या. त्याच्या काही तास आधीच अजित पवारांचे पुतणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत मतदारांना भावनिक आवाहन केले आहे.

काय म्हटले आहे रोहित पवारांनी?

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठीच विमानाने जात असताना काळाने घाला घातला आणि मा. अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं. या दुःखद घटनेमुळं नियोजन करुनही पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाता आलं नाही, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे.

Ajit Pawar Rohit Pawar
Maharashtra Government : सरकारी कार्यालयात चाललाय, मग ही बातमी वाचाच; फडणवीसांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचं वाढवलं टेन्शन...

त्यामुळं निवडणूक असलेल्या बाराही जिल्ह्यातील मतदारांना विनंती आहे की, अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करण्याची हीच ती योग्य वेळ आणि अजितदादांचे विचार पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. एकप्रकारे त्यांनी मतदानाबाबत मतदारांना आवाहनच केले आहे.

Ajit Pawar Rohit Pawar
PM Modi in Lok Sabha : लोकसभेत आज 21 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला; मनमोहन सिंग यांच्यानंतर मोदींवर आली ‘नकोशी’ वेळ…

दरम्यान, पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आघाडी केली आहे. महापालिका निवडणुकीतही पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची आघाडी झाली होती. काही ठिकाणी घड्याळ तर काही ठिकाणी तुतारी या चिन्हावर उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र, या निवडणुकीत फारसे यश हाती लागले नाही. आता अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com