

pending ZP teacher transfers update : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत प्रधान सचिव यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा मुहूर्त सापडल्याचा दावा प्रहार शिक्षक संघटनेने केला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची मागील तीन वर्षांपासून रखडलेली आंतर जिल्हा बदलीप्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने मुंबई आझाद मैदानावर प्रखर आंदोलनाचा इशारा प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिला होता.
आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा कार्यान्वित करण्यापूर्वी सर्व जिल्हा परिषदांना शिक्षक संवर्गाचे रोस्टर अद्ययावत करण्याच्या कालमर्यादित सूचना द्याव्यात, शासननिर्णयानुसार पेसा क्षेत्रात 20 टक्के व नॉन-पेसा क्षेत्रात 80 टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेकरिता उपलब्ध करून देण्यात यावी.
आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेत उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना आरक्षित पदावर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे शिक्षक भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गाकरिता परावर्तित करण्यात यावी, आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेसाठी ३१ मे २०२६ अखेर पर्यंतचे रिक्त पदे गृहीत धरण्यात यावी, आंतरजिल्हा बदलीप्रक्रियाकरिता स्वतंत्र वेळापत्रक निर्गमित करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया रखडली होती. निवेदनाची सकारात्मक दखल घेऊन ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदलीबाबत कार्यवाही सुरू केल्याने बदली प्रतीक्षेतील १२ हजारांवर शिक्षकांना न्याय मिळणार असल्याचे समाधान आहे. मात्र पाठपुरावा सुरूच राहील. -महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.