अमर राजूरकर विधान परिषदेत तर; सुरेश वरपूडकर विधानसभेत कॉंग्रेसचे प्रतोद 

amar-rajurkar
amar-rajurkar
Published on
Updated on

औरंगाबादः सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेतील कॉंग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांची विधान परिषदेच्या प्रतोद पदी, तर परभणीचे सुरेश वरपुडकर यांनी विधानसभेच्या मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. राजूकर हे नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष देखील आहेत. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ सचिवाकडे या संदर्भात नुकतीच शिफारस केली असून अमर राजूरकर यांच्यावर पक्षाच्या वतीने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मागील अनेक वर्षापासून माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  राजूरकर कॉंग्रेस पक्षाचे काम करत आहेत. ते नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष देखील आहेत. अशोक चव्हाण यांच्या शिफारशीवरूनच राजूरकर यांच्यावर विधान परिषदेतील प्रतोद पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

या शिवाय कॉंग्रेसकडून विधान परिषदेचे मुख्य प्रतोद म्हणून भाई जगताप यांची तर विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणून पाथरीचे आमदार सुरेश वरपूडकर, प्रतोदपदी आमदार प्रणीती शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com