माजी मंत्री दिवाकर रावते यांच्या खासगी पीएचा असाही थाट

माजी मंत्री दिवाकर रावते यांच्या खासगी पीएचा असाही थाट
Published on
Updated on

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयाच्या सहाव्या माळ्यावर असलेल्या विश्राम गृहातील वातानुकूलित खोली क्रमांक 65 मध्ये माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे खासगी पीए अशोक गव्हाणे अद्यापही मुक्कामी आहे.

खासगी व्यक्तीला एसटीच्या विश्रामगृहात खोली मिळवायची असल्यास दिवसाला हजार रूपये भाडे भरायचे असते. मात्र, मनोरा आमदार निवास पाडल्यानंतर गव्हाणे यांनी आमदार निवासातून थेट एसटीच्या मुख्यालयातील विश्रामगृहाच्या परिवहन मंत्र्यांच्या राखीव खोलीतच मुक्काम ठोकला आहे.

एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाच्या सहाव्या माळ्यावर विश्रामगृह उभारण्यात आले आहे. याठिकाणी विश्राम गृहाची बुकिंग करतांना, साधे कक्ष आणि वातानुकूलित कक्षांना प्रति व्यक्ती प्रति दिन शुल्क आकारले जाते. त्यातही खासगी व्यक्तींना याठिकाणी जास्तीत जास्त शुल्क आहे. साधे कक्ष 500 रूपये तर वातानुकूलित कक्षासाठी 1000 रूपये शुल्क आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून परिवहन मंत्र्यांच्या नावावर गव्हाणे राहत असल्याचे दिसून येत आहे. गव्हाने दिवसाला या खोलीत राहत नसून रात्रीला याच खोलीत येऊन त्यांचा नियमीत मुक्काम असल्याचे दिसून येत आहे.

दोन वर्षांपासून खासगी पीएला परिवहन मंत्र्यांची खोली दिल्या जात असल्याने त्याचे भाडे आकारल्या जाते का ? नवीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी गव्हाने यांना राहण्यासाठी परवानगी दिली का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, विनापरवानगी परिवहन मंत्र्याच्या राखीव खोलीचा लाभ गव्हानणे घेत असल्यास त्याला अभय कोणाचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंदर्भात एसटीच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र जवंजाळ यांना विचारणा केली असता, यासंदर्भात माहिती घ्यावी लागेल असे सांगितले. तर एसटीचे स्थापत्य अभियांत्रीकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश पडलवार यांनी हा विषयच आपल्याकडे नसून त्यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगून माहिती देण्यास नकार दिला.

खोलीची चावी सिक्‍युरिटी गार्डकडे
विश्रामगृहाची जबाबदारी स्थापत्य अभियांत्रीकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश पडलवार यांच्याकडे आहे. मात्र, खोलीची चाबी एसटी मुख्यालयाच्या सिक्‍युरिटी गार्डकडे ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्र्यांच्या नावावर खोलीचे नुतनीकरण
परिवहन मंत्र्यांसाठी खोली क्रमांक 65 राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र परिवहन मंत्री एसटी मुख्यालयातील विश्रामगृहात कधीच आले नाही. मात्र, त्याच्या ऐवजी त्यांच्या खासगी पिए यांनीच खोलीचे नूतनीकरण करून घेत, परिवहन मंत्र्यांच्या नावावर आरामदायक सुविधा घेत आले आहे.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com