Mumbai News : महायुती सरकारनं प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या दोन उपायुक्तांची उल्हासनगर महापालिकेत एन्ट्री झाली आहे. दीपाली चौगले आणि अनंत जवादवार अशी या दोन उपायुक्तांची नावे आहेत. हे दोन्ही 2016 मधील एकाच बॅचचे अधिकारी आहेत.
उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी याबाबची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने चौगले अन् जवादवार या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही बॅचमेट आता आपल्या कार्यकाळात उल्हासनगरमधील कुठल्या समस्या सोडविणार, विकासाची कुठली कामे करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
दोन्ही अधिकाऱ्यांच्या मदतीने आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नागरी सुविधांच्या तसेच समस्यांच्या फाईलींचा निपटारा जलदगतीने व्हावी, यासाठीच राज्य सरकारने दीपाली चौगले आणि अनंत जवादवार या दोन्ही अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर पदोन्नती करून त्यांना प्रतिनियुक्तीवर उल्हासनगर महानगरपालिकेत पाठवले आहे.
अनंत जवादवार हे देखील एमपीएससी उत्तीर्ण असून त्यांनी दिंडोरी मध्ये मुख्याधिकारी व नंदुरबार आणि हिंगोली येथे जिल्हा प्रशासन अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तर दीपाली चौगले यांनी तीन वर्षे विदर्भातील अकोला महापालिकेत सहायक आयुक्त पदी काम केले आहे. नवीमुंबई येथे नगरपरिषद प्रशासन संचालनालय येथे सहायक आयुक्त पद सांभाळले आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून उल्हासनगर महापालिकेत ही मुख्य पदे रिक्त होती. तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांच्या कालावधीत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त किशोर गवस यांची अतिरिक्त आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे.
चार महिन्याचा आयुक्त पदाचा पदभार हाताळणारे आयएएस अधिकारी विकास ढाकणे यांच्या कालावधीत सरकारने विशाखा मोटघरे यांची उपायुक्त म्हणून प्रतिनियुक्तीवर उल्हासनगरात पाठवलेले आहे. ढाकणे यांच्या कारकिर्दीतच उपमुख्य लेखा अधिकारी डॉ.विजय खेडकर यांची सामान्य प्रशासनाच्या उपायुक्त पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
प्रतिनियुक्तीवरील सहायक आयुक्त म्हणून अजय साबळे,सुनील लोंढे,मयुरी कदम महानगरपालिकेत रुजू झालेले आहेत. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची बदली झाल्याने हे पद रिक्त असून आहे. त्यांच्या जागी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मागणीनुसार प्रतिनियुक्तीवर कुणाला पाठवण्यात येते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.