Beed News: सत्तेत येताचं महायुतीनं शब्द फिरवला; कर्जबाजारी तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन!

Farmer ends life due to debt :महायुती सरकरानं सत्तेत येण्यापूर्वी कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. सरकार कर्ज माफ करणार या आशेवर आकाश रोडगे होते. पण कर्ज माफीची आशा मावळल्याने कर्ज कसे फेडायचे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता.
Farmer ends life due to debt
Farmer ends life due to debtSarkarnama
Published on
Updated on

Beed Farmer Ended-His Life: निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीनं शेतकऱ्यांना पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते, पण सत्तेत येताच त्यांनी शब्द फिरवला. शेतकऱ्यांच्या तौंडाला पाने पुसली.कर्जमाफीची आशा मावळ्याने एका तरुण शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री बीडच्या गेवराईत ही घटना घडली.

महायुतीनं विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी तब्बल २३० जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा बहुमतात सत्तास्थापन केली.फडणवीस सरकार लवकरच कर्जमाफी करणार आणि आपली आर्थिक अडचण कमी होणार, अशी राज्यातील शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

Farmer ends life due to debt
Maharashtra Railway: नक्षलग्रस्त जिल्हा येणार रेल्वेच्या नकाशावर; विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार

आकाश श्रीराम रोडगे(वय ३६) रा.रांजणी ता.गेवराई जि.बीड असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेतून पत्नी वैशाली रोडगे यांच्या नावावर ७० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते.

महायुती सरकरानं सत्तेत येण्यापूर्वी कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. सरकार कर्ज माफ करणार या आशेवर आकाश रोडगे होते. पण कर्ज माफीची आशा मावळल्याने कर्ज कसे फेडायचे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. गेल्या काही दिवसापासून ते याच चिंतेत होते. त्यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरात सर्व कुटुंबिय झोपले असताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांच्या कुटुंबियांनी गेवराई पोलिसांनी याबाबतची माहीती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर रांजणीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

शेतकऱ्यांना यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाल्याने आता या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार

“सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्पष्ट सांगतो की, ३१ मार्चच्या आधी त्यांनी आपल्या कर्जाची परतफेड करावी. राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नाही.” उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं शेतकरी कर्जमाफीबाबतचं हे विधान आहे. बारामतीतील एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com