Keshav Upadhye : ''आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे मुंबईकरांवर 10 हजार कोटींचा बोजा!''

Keshav Upadhye News: आदित्य ठाकरे यांनी मुंबईद्रोह केलाच आहे, किमान त्यांनी आता महाराष्ट्रद्रोह तरी करु नये...
Aditya Thackeray Latest Marathi News
Aditya Thackeray Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

Keshav Upadhye : सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील मेट्रो कारशेडच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. आता आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे महाराष्ट्र आणि मुंबईकराच्या डोक्यावर 10 हजार कोटींचा अधिकचा बोजा पडणार आहेे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुंबईद्रोह केलाच आहे, किमान त्यांनी आता महाराष्ट्राशी तरी द्रोह तरी करु नये अशा शब्दांत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. (Keshav Upadhye latest news)

केशव उपाध्ये हे मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सडकून ठाकरेंवर टीका केली.

उपाध्ये म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. माकेवळ आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे महाराष्ट्राला आणि मुंबईकराला 10 हजार कोटी जास्त भरावे लागणार आहे. तसेच मेट्रोला देखील विलंब होतो आहे. आणि 10 हजार कोटींचा बोजाही महाराष्ट्र आणि मुंबईकराच्या डोक्यावर टाकला जात आहे.

हा बोजा बालहट्टामुळे विलंब करणाऱ्या आदित्य ठाकरे आणि त्याला उध्दव ठाकरेंची असलेली मान्यता यामुळे आहे. त्यामुळे 10 हजार कोटींचा बोजा ठाकरेंकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी देखील केशव उपाध्ये यांनी यावेळी केली.

Aditya Thackeray Latest Marathi News
Mangal Prabhat Lodha : प्रतापगडावर नवा वाद ; भाजपच्या मंत्र्यांने मुख्यमंत्री शिंदेंची केली शिवरायांसोबत तुलना

मुंबईकरांना साधे रस्तेही न देऊ शकणारे लोक फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे सुरू होणाऱ्या मेट्रोत खोडा घालत होते. मुंबईकरांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचा आदित्य ठाकरेंचा डाव होता का? असा सवाल उपस्थित करतानाच वेदांतावर आरोप करून किमान महाराष्ट्रद्रोह तरी करू नका. वेदांता प्रकरणी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्याचा एक तरी कागद आदित्य ठाकरेंनी सादर करावा असेही उपाध्ये यावेळी म्हणाले.

Aditya Thackeray Latest Marathi News
Maharashtra Police : बदल्यांतील घोळ : डीसीपींना बदलीनंतर २२ दिवसांनी मिळाली नियुक्ती

काल एका मोठ्या उद्योगाची महाराष्ट्रात एंट्री झाली आणि अशाच वेळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे औद्योगिक वातावरण कलुषित करण्याचे पाप ठाकरेंनी करू नये. तसेच छत्रपतीचे वंशज असल्याचा पुरावा संजय राऊत यांनी उदयनराजेंकडे मागितला होता. त्याच उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू असल्याची भूमिका ते मांडत आहेत. त्यामुळे राऊतांची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे अशा शब्दांत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे.

वाचाळवीरांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक आहे. त्यांनी आधी त्यांच्या लोकांना आवरावे.जर शिंदेंनी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली आणि कार्य केले असेल तर त्यात चूक काय ? शिवाजी महाराजांच्या नावाने होणारे राजकारण चुकीचेच असल्याचेही उपाध्ये यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com