Mangal Prabhat Lodha : प्रतापगडावर नवा वाद ; भाजपच्या मंत्र्यांने मुख्यमंत्री शिंदेंची केली शिवरायांसोबत तुलना

Mangal Prabhat Lodha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच असे लोढा यांनी हे विधान केले आहे.
MangalPrabhat Lodha
MangalPrabhat LodhaSarkarnama
Published on
Updated on

Mangal Prabhat Lodha : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा विषय ताजा असताना यात अजून एका मंत्र्यांने भर घातली आहे. (Mangal Prabhat Lodha latest news)

प्रतापगडावर शिवप्रताप दिन कार्यक्रमात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच लोढा यांनी हे विधान केले आहे.

MangalPrabhat Lodha
Sanjay Raut : राज्यपाल अजूनही राजभवनात कसे ? ; राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

प्रतापगड किल्ल्यावर आज शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाची तुलना केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याआग्र्याच्या सुटकेशी केली आहे. यावरुन आता राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MangalPrabhat Lodha
Eknath Shinde : धैर्यशील माने यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सोपवली मोठी जबाबदारी

"औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना रोखून ठेवलं होतं, पण शिवाजी महाराज स्वराज्यासाठी बाहेर पडले, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी रोखलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले," असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी लोढा यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी शिवप्रताप दिनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतापगडावरील उपस्थितीवरुन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांना अधिकार नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com