Mumbai News, 14 May : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) प्रचाराची एकीकडे धामधूम असताना मुंबईला सोमवारी ( 13 मे ) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला. दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं. त्याखाली 88 जण अडकले होते. यामध्ये 74 जणांना वाचवण्यात यश आलं असून 14 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती 'एनडीआरएफ'नं दिली आहे.
घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर होर्डिंग फाउंडेशनसह ( Mumbai Hoarding Collapse ) उखडून पडलं. होर्डिंग तकलादू पद्धतीनं लावल्यानं निष्काजीपणाचे मुंबईकर बळी ठरले आहेत. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे कोसळल्यानं त्याखाली वाहनं दबली गेली. दुर्घटना एवढी मोठी होती की 'एनडीआरफ'च्या जवानानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा जाहीरात कंपनीचे संचालक भावेश भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारनं जाहीर केलीय तर, जमखींच्या उपाचाराचा खर्च सरकार करणार आहे.
दरम्यान, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासह दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. तसेच, अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे, असे निर्देष मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.