कोकणातही शिवसेनेला खिंडार पडणार ? वीस नगरसेवक उदय सामंतांच्या संपर्कात

उदय सामंत (uday samant) यांच्या नेतृत्वाखाली हे २० नगरसेवक लवकरच शिंदे गटात सामील होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
Uday Samant Latest Marathi News
Uday Samant Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी : बंडखोरी झाल्यामुळे शिवसेनेची मोठी वाताहत झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले असून शिंदे गटाकडे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपद असल्यामुळे अनेक इच्छुकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदरनंतर आता कोकणात शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. (uday samant news update)

रत्नागिरी नगरपरिषदेतील (ratnagiri municipal council) 23 पैकी 20 नगससेवक शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील 9 नगरसेवकांना शिंदे गटात सामील केले आहे.

आता माजी मंत्री, बंडखोर आमदार उदय सामंत (uday samant) यांच्या नेतृत्वाखाली हे २० नगरसेवक लवकरच शिंदे गटात सामील होण्याच्या हालचाली सुरु असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आता उदय सामंत सुद्धा 20 नगरसेवकांना फोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Uday Samant Latest Marathi News
shiv sena : माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी

रत्नागिरी नगरपरिषदेतील नगसेवकांचा मोठा गट सामंत यांच्यासोबत असल्याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरु आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उदय सामंत यांची रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर अनेक नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली. या नगरसेवकांनी आपण आपल्या सोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक , शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com