Praful Patel News : '' आघाडी सरकारमध्ये आम्ही सत्तेत होतो, पण...''; प्रफुल्ल पटेलांचा शिवसेनेबाबत खळबळजनक दावा

Maharashtra Politics : ''...त्यामुळे आम्हाला पुन्हा सत्तेत यावे लागले !''
Praful Patel
Praful PatelSarkarnama

Bhandara : महाविकास आघाडी सत्तेत असताना शिवसेना काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही घटक पक्ष एकत्र नांदत होते. आघाडीचे नेतेही एकमेकांना उत्तमप्रकारे 'कव्हर'देखील करत होते. मात्र, शिवसेनेतील बंडखोरीनंतर आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादीही फुटली.

आता आघाडी सरकारमधील एकेकाळच्या मित्रपक्षांतील नेतेमंडळींकडूनच एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांचे नवे नवे बॉम्ब टाकले जात आहेत. आता अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेलांनी शिवसेनेविषयी खळबळजनक दावा केला आहे.

Praful Patel
Sharad Pawar News : नेहरूंनी वैज्ञानिकांना दिलेल्या प्रोत्साहनाचे चीज झाले ; पवारांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे केले कौतुक

राष्ट्रवादीचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) बुधवारी भंडारा येथे माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पटेल म्हणाले,अडीच वर्षात आम्ही सत्तेत होतो,मात्र खऱ्या अर्थाने सत्ता आमच्याकडे मिळाली नव्हती. पण आम्ही शिवसेनेसोबत जाऊन सत्ता मिळविली, तेव्हा त्यांच्यासोबत आमचे ध्येयधोरण सुसंगत नव्हते. त्यामुळे आम्हाला पुन्हा सत्तेत यावे लागल्याचा गौप्यस्फोट खासदार पटेलांनी केला आहे.

शरद पवारसाहेब आमचे सदैव दैवत असून पवारसाहेबांना मानणारा मी माणूस आहे. त्यांना आजही नव्हे तर उद्यासुद्धा मानेन. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पवारसाहेबांबद्दलच्या कोणत्याही गोष्टी कुणी सांगितल्या तर ऐकायचे नाही आणि बोलायचे नाही. जर त्यांच्याविषयी कुणी चर्चा केली तर थांबायला पाहिजे असे वक्तव्यावरून पटेलांनी भंडारा शहरात अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या बॅनरवर पवारांचे फोटो झळकल्यानंतर केले.

Praful Patel
Praful Patel Meets Nawab Malik: नवाब मलिकांसाठी अजितदादा गटाची तगडी फिल्डिंग; प्रफुल्ल पटेलांसह मोठ्या नेत्यांनी घेतली भेट

छगन भुजबळांची पाठराखण...

छगन भुजबळ अशा पद्धतीने चुकीचे बोलू शकत नाही. ते जबाबदार व्यक्ती असून सर्वसामान्यांना, गोरगरीब समाजातील सर्व घटकांना ते सोबत घेवून चालतात. कोणत्याही समाजाची मने दुखावतील असे बोलणार नाही. त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे म्हणत पटेलांनी एकप्रकारे भुजबळांची पाठराखणच केली.

'' रोहित पवार भंडारा- गोंदियात आले तर...''

आमदार रोहित पवार भंडारा- गोंदियात आले तर त्यांचे मनापासून स्वागत आहे. त्यांनी माझ्याघरी यावं,जेवण करावं. पण राजकारण त्यांच्या बाजूने करावं, त्यांनी माझ्याविरोधात भाषण केले तरी चालेल असा मिश्किल टोलाही त्यांनी पवारांना लगावला.

Praful Patel
Rohit Pawar On Chandrayaan-3 : रोहित पवार म्हणाले ; शाब्बास ! हे यश सर्वस्वी 'इस्त्रोचे'...

शरद पवार (Sharad Pawar) हे मुळावर घाव घालतात. आमदार जास्त असण्यापेक्षा कार्यकर्ते किती हे महत्वाचे आहेत, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते. त्यावर पटेल म्हणाले,या वादावादीमध्ये पडण्यात काही काही अर्थ नाही. कार्यकर्ते आणि पक्षाचा जे काही भविष्य आहे ते निवडणूक आयोग ठरवेल.

'' आमचा लोकसभेला एनडीएचा घटक म्हणून...''

लोकसभेला आमची एनडीएचा घटक म्हणून लढायची पूर्णपणे तयारी आहे. त्यासाठी योग्यरीतीने ज्या ज्या जागेवर आमची ताकद असेल त्या त्या जागेवर उमेदवारांसाठी तयारी करू. एनडीएतील घटक पक्षाशी चर्चा करूनच उमेदवार उभे करू असेही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com