गुवाहटी : मंत्री गुलाबराव पाटील आज ३ आमदारांसह गुवाहटीमध्ये दाखल. यात अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित, योगेश कदम यांचा समावेश आहे. गुलाबराव पाटील यांनी तिथे पोहचल्यानंतर एकनाथ शिंदे यांना वाकून आदरार्थाी नमस्कार केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी बोलताना पाटील यांनी उद्या आणखी आमदार गुवाहटीममध्ये पोहचणार असल्याचा दावा केला आहे.
आज सकाळीच गुलाबराव पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना आपण गुवाहटीला जाणार असल्याचे सांगितले होते. माझ्या रक्तात शिवसेना (Shivsena) आहे, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. पक्ष बदलणार नाही, मी गुवाहटीला चाललो आहे. राज्यातील बहुतेक मंत्री नेते गेले. जिल्यातील तीन जणही गेले मी एकटा काय करू? असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले होते.
शिवसेनेच्या परिस्थितीबाबत बोलतांना ते म्हणाले, कि अत्यंत वाईट परिस्थिती आहे, सर्वच फाटलं आहे. त्यामुळे आता ते साधंणही कठीण आहे. वातावरण पाहून पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायला हवा होता. परंतु आता त्याचीही वेळ निघून गेली आहे. होय पण आपण पक्ष बदलणार नाही, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. शिवसैनिक म्हणूनच कार्य करणार आहोत. कारण शिवसेना, आपल्या रक्तात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
शिवसेना वाढविण्यासाठी संघर्ष करणारे तसेच टपरीधारकापासून तर थेट मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. आपल्या भाषणशैलीने ते सर्वांना मंत्रमुग्ध करतात, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुध्दा त्यांच्या भाषणाचे कौतुक करीत असत. जळगाव जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात त्यांनी मोठे कष्ट घेतले आहे. जिल्ह्यात त्यांनी अनेक आंदोलने आणि मोर्चे काढले आहेत. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे.
राज्यात सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक मंत्री तसेच आमदारासह ४० जण असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ते सर्व जण आसाम राज्यातील गुवहाटी येथे आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे चार पैकी तीन आमदार अगोदरच गुवहाटी येथे गेले आहेत. मंत्री गुलाबराव पाटीलही नॉट रिचेबल होते. त्यामुळे त्यांच्याबाबतीतही चर्चा सुरू होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.