Maharashtra Budget : शिक्षण सेवकांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ; बस तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत

Maharashtra Budget Session : ''विनाअनुदानित शाळांना अनुदानित करण्यात येईल''
Maharashtra Budget Session
Maharashtra Budget Session Sarkarnama

Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा अर्थसंकल्प साजर केला. या अर्थसंकल्पादरम्यान त्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये शिक्षण सेवकांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये ५ हजारांची वाढ करण्यात आली आहे. तसेच प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. याबरोबरच विनाअनुदानित शाळांना अनुदानित करण्यात येईल.

एसटी महामंडळामध्ये ५ हजार १५० नवीन ईलेक्ट्रीक बसेस दाखल होणार आहेत. तसेच नवीन वाहन खरेदी करण्यासाठी काही कर सवलती देण्यात येणार आहे. तसेच सरकारच्या वाहनामध्ये इलेक्ट्रीक गाड्याचा समावेश करण्यात येणार आहे.

Maharashtra Budget Session
Maharashtra Budget 2023 : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ : रिक्तपदांचीही भरती होणार!

वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार

- राज्यात १४ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची नवीन बांधकामं करण्यात येणार आहेत. यामध्ये जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्याचा समावेश आहे.

व्यसनमुक्ती केंद्रे उभारण्यात येणार :

- व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता आणि मानसिक अस्वास्थ पाहता नागपूर, जालना, पुणे येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे उभारण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना गणवेश मोफत मिळणार

- विद्यार्थ्यांना आता गणवेश मोफत मिळणार आहे. तसेच अंगणवाडी ते उच्च शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल १ लाख ११ हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. सरकारी शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातील.

Maharashtra Budget Session
Maharashtra Budget Session : फडणवीसांची शिवप्रेमींना मोठी भेट; शिवनेरीवर उभारणार शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय

सहा विमानतळासाठी मोठी घोषणा

- राज्यातील सहा विमानतळाचा विकास करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटी, छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी 734 कोटी, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार करण्यात येणार, नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी देण्यात येणार आहेत.

Maharashtra Budget Session
Maharashtra Budget 2023 : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ : रिक्तपदांचीही भरती होणार!

बस तिकिटाच्यादरात महिलांना 50 टक्के सवलत

- राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मुलींच्या सक्षमीकरणाकरता 'लेक लाडकी' ही नवी योजना सुरू करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com