मुंबई : काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या (president) निवडणुकीसाठी (Election) सोमवारी (ता. १७ ऑक्टोबर) मतदान होणार आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) तब्बल ५६१ जण या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातून मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) जादा मते घेतात की त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी शशी थरूर (Shashi Tharoor) हे आघाडी घेतात, याकडे राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे. (561 representatives from Maharashtra will vote in election for Congress president)
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुंबईतील मुख्यालय टिळक भवन येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान करता येणार आहे. देशभरातील सर्व राज्यांमध्ये हे मतदान होणार आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील ५६१ प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात.
या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आमदार कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत. त्यांनी रविवारी (ता. १६ ऑक्टोबर) टिळक भवन येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. जे प्रदेश प्रदेश प्रतिनिधी मतदार आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बारकोड असलेले ओळखपत्र दिलेले आहे. ते ओळखपत्र आणि दुसरे कुठलाही फोटो पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यात ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी एक अशी दोन्ही ओळखपत्रे दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर असे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रदेश प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.