राज ठाकरेंच्या भेटीचे कारण खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितले...

शिंदे यांच्या कालच्या भेटीमागे राज ठाकरे यांचे आजचे पत्र तर नाही ना, अशी चर्चा राज्यात रंगली आहे.
Raj Thackeray-Eknath Shinde
Raj Thackeray-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी (ता. १५ ऑक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. त्या भेटीसंदर्भात राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. विशेषतः अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भानेही चर्चा होत आहे. त्यातच राज ठाकरे यांनी आज (ता. १६ ऑक्टोबर) पोटनिवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. मात्र, त्या भेटीचे कारण खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सांगितले आहे. (Chief Minister Shinde himself told the reason for Raj Thackeray's visit...)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीसंदर्भात सांगितले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आरोग्य विषयक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. या वेळी राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी तळमळीने काही सूचना केल्या. तसेच त्यांनी सुचवलेल्या एका उपायाचा लाईव्ह डेमो देखील या बैठकीत दाखवण्यात आला. त्यांनी सुचवलेल्या या पर्यायांचा आरोग्य व्यवस्थेत नक्की समावेश करण्याबद्दल सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन राज ठाकरे यांना देण्यात आले आहे.

Raj Thackeray-Eknath Shinde
राज्यातील हजारो मराठी शाळा बंद करण्याचा ईडी सरकारचा घाट : अजित पवारांचा आरोप

या प्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव संजय खंदारे, राष्ट्रीय आरोग्य सेवा अभियान आरोग्य सेवा संचालक तुकाराम मुंढे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना, आरोग्य विभागातील सर्व प्रमुख वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Raj Thackeray-Eknath Shinde
जामनेरच्या ‘त्या’ पोलिसाच्या माध्यमातून माझ्या अटकेसाठी षडयंत्र रचलं जातंय : खडसेंचा गौप्यस्फोट

दरम्यान, राज ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती आहे. शिंदे यांच्या कालच्या भेटीमागे राज ठाकरे यांचे आजचे पत्र तर नाही ना, अशी चर्चा राज्यात रंगली आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनीच भेटीचे कारण सांगितले आहे. तेवढेच कारण कालच्या भेटीमागे होते का की आजच्या पत्राचा विषय होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com