Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama

Aditya Thackeray : मुंबई महापालिकेत ६ हजार कोटींचा घोटाळा; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर गंभीर आरोप

Aditya Thackeray News : 'सदा सरवणकर यांच्यावर अद्याप कारवाई का झाली नाही?'

Aditya Thackeray : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ४०० किलोमीटर रस्त्यांसाठी तब्बल ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर या घोटाळ्याचे आरोप त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केले आहेत. तसेच या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. शिवसेना नेते (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे हे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले.

आदित्य ठाकरे म्हणाले, ''मुख्यमंत्री शिंदे यांनी नवीन सरकार स्थापन झाल्यावर मुंबईतीमधील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. तर त्यासाठी सरकारकडून तब्बल ५ हजार कोटींचे टेंडर जाहीर करण्यात आले होते. मात्र, याला कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ६ हजार ८० कोटीचे नवीन टेंडर जाहीर केलं. मग याच टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे'', असा आरोप ठाकरेंनी केला.

Aditya Thackeray
Konkan News : कोकणात शिवसेनेच्या विरोधात भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिंदे गट एकत्र

''या देण्यात आलेल्या रस्त्यांच्या कंत्राटामध्ये जीएसटीचे पैसे वेगळे लावण्यात आलेत. तसेच कंत्राटाच्या माध्यमातून कंत्राटदारांना तब्बल ४८ टक्क्यांचा फायदा शिंदे सरकारने करुन दिला आहे. हा सर्व प्रकार मुंबईकरांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.''

''मुंबईत कोणत्याही रस्त्याचा काम करण्याचा सिझन १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर असा असतो. पण हे काम आता दिलं तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काम सुरु झाल्यास हे काम होईल का नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे मुंबईत ४०० किलोमीटर रस्ते खोदून ठेवल्यावर ती कामं पूर्ण कधी होणार'', असा सवाल यावेळी आदित्य ठाकरेंनी केला.

Aditya Thackeray
Eknath Shinde News : "मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द पाळला" : सीमाभागातील कार्यकर्त्यांनी केला सत्कार!

''एखादा रस्ता बनवत असताना ४२ युटीलिटी रस्त्याच्या खाली असतात. त्यासाठी १६ एजन्सीज बरोबर बोलावं लागतं. वाहतूक पोलिसांची देखील परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर ही कामे मार्गी लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. सध्या मात्र कुठलाही विचार केला जात नाही. ४०० किमी रस्त्यांसाठी ६ हजार ८० कोटींचं टेंडर काढण्यात आलं आहे'', असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Aditya Thackeray
Ravi Rana-Navneet Rana यांच्या कृषी महोत्सवावर पोलिसांची कारवाई; राजकीय नेत्यांचे बॅनर हटवले

''शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांच्या बंदुकीतून गोळी सुटली असा अहवाल समोर आलाय, पण तरी देखील अद्याप कारवाई झालेली नाही. सदा सरवणकर यांना सरकारच वाचण्याचा प्रयत्न करत आहे. स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे. मुंबई महापालिकेची लूट खोके सरकारने सुरू केली'', असा आरोप यावेळी त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com