Devendra Fadnavis : "80 टक्के मराठा हिंदुत्ववादी, मला खलनायक ठरवलं तरीही...", विधानसभेबाबत फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis 80 percent Maratha Hindutvavadi statement: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड टीका आणि आरोप करतात. फडणवीस यांच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी अनेकवेळा केला आहे. शिवाय आता मराठा समाज भाजपच्या विरोधात असल्याच्या चर्चाही सुरू आहेत.
Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis | Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीकेचे धनी ठरलेले राज्यातील भाजपचे प्रमुख नेते उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीच्या बाजून ठामपणे उभा राहिल असा विश्वास व्यक्त केला आहे.

शिवाय मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) फेक नरेटिव्ह पसरवून महाविकास आघाडीने मला खलनायक ठरवल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आपल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड टीका आणि आरोप करतात.

फडणवीस यांच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी अनेकवेळा केला आहे. शिवाय आता मराठा समाज भाजपच्या (BJP) विरोधात असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. अशातच आता फडणवीस यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मराठा समाज या निवडणुकीत आपल्या बाजून उभा राहिल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
PM Modi in Mumbai: पंतप्रधान मोदींचं 'शिवतीर्थ'वरुन उद्धव ठाकरेंना चॅलेंज; म्हणाले 'एकदा तरी राहुल गांधींच्या...'

यावेळी फडणवीस (Devendra Dadnavis) म्हणाले, "80 टक्के मराठा समाज हिंदुत्ववादी असून 20 टक्के पुरोगामी असतील. तसंच मराठा समाज नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला गेला." यावेळी त्यांनी मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा असल्याचा विश्वास व्यक्त केला.

ते म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण, सारथी संस्था, मराठा समाजाच्या विविध मंडळांना भरीव आर्थिक तरतूद केल्यामुळे मला या समाजाची सहानुभूती असून विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील. लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठा समाजात फेक नरेटिव्ह पसरवलं गेलं.

Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Mallikarjun Kharge On Modi: राहुल गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत का? मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल

मला खलनायक ठरवलं

मला जाणीवपूर्वक खलनायक ठरवलं गेलं. यामागे मराठा समाजाची नाराजी नव्हती तर महाविकास आघाडीचा हात होता. 80 टक्के मराठा समाज हा पारंपरिकदृष्ट्या हिंदुत्ववादी विचारांचा असून या समाजाने नेहमीच महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. या निवडणुकीतही ते आम्हालाच कौल देतील", असा विश्वास व्यक्त केला.

घाव घालायला वेळ लागत नाही पण...

तर जातीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात दरी निर्माण होणे हे चिंताजनक असल्याचंही ते म्हणाले, "वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या मराठा आणि ओबीसी या समाजांमध्ये दुरावा निर्माण होणं महाराष्ट्राला परवडणारं नाही. घाव घालायला वेळ लागत नाही, पण जखम भरायला वेळ लागतो."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com