IIM For Mumbai : केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला आहे. राजधानी मुंबईत भारतीय व्यवस्थापन संस्था (Indian Institutes of Management) उभारण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीय या संदर्भात निर्णय घेतल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.
मुंबईत IIM म्हणजेच भारतीय व्यवस्थापन संस्था सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने या निर्णय घेतला.नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ( National Institute for Training in Industrial Engineering) ही देशातील २१ वी तर राज्यातील दुसरी आयआयएम असेल. यापूर्वी राज्यात फक्त नागपूरमध्ये आयआयएम होती. पण मोदी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी राज्यातील भाजप ने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
पवईत NITIE कॉलेजला IIM ची परवानगी मिळाली. आयआयएमच्या 350 जागा मुंबईत मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईल, असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने शैक्षणिक धोरण बदलण्याचे धाडस केले आहे. मोदी सरकारने शिक्षण धोरणात केलेले बदल विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाणार आहोत. मुंबईला सगळे मिळत आहे, केंद्र सरकारच्या या योजना जनतेपर्यंत नेणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीले होते. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील शिक्षण पद्धतीचा दर्जा खालावल्याची खंत व्यक्त केली होती. अजित पवारांच्या बंडानंतर पत्राद्वारे प्रथमच शरद पवारांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे की, सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र, आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे, ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.