Nashik News : नाशिकमध्ये आज राज्य सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य नेतेही उपस्थित होते. याप्रसंगी फडणवीस यांनी ठाकरे गटासह विरोधकांवर सडकून टीका केली आहे. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस आपले सगळे कार्यक्रम रद्द करून थेट नागपूरला पोहचले आहेत. (Latest Marathi News)
नाशिक येथील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस थेट नागपूरला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या कार्यक्रमानंतर आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून फडणवीस नागपूरला पोहचले आहेत . ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमनंतर मुलींसाठी सैनिकी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आणि ‘एमआयडीसी’च्या सर्व समावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली कार्यशाळेला फडणवीस उपस्थित राहणार होते.
मात्र फडणवीसांनी आपले ठरलेले नियोजित कार्यक्रम रद्द करत थेट नागपूरला रवाना झाल्याने, चर्चांना उधाण येत आहे. नाशिक येथील विमानतळावर फडणवीस दाखल झाले होते. येथून फडणवीसांनी नागपूरच्या दिशेने करणार टेक ऑफ केले आहे. मात्र सर्व कार्यक्रम रद्द करून फडणवीस तडक नागूपूरला का निघाले? याबाबत चर्चांना उधाण येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.