Vasudev Kale : अजितदादांसारख्या बड्या नेत्यापुढे भाजपला मजबूत करणं वासुदेव काळे यांच्यापुढे आव्हान..

BJP News : विधानसभेसाठी अनेकदा ते इच्छुक होते मात्र पक्षाने दरवेळेस त्यांना संधी दिली नाही.
Ajit Pawar, Vasudev Kale
Ajit Pawar, Vasudev KaleSarkarnama
Published on
Updated on

Baramati : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार भाजप शिवसेना युतीच्या सरकारसोबत सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्षांची फेररचना करताना यंदा पुणे जिल्ह्यामध्ये वासुदेव काळे व शरद बुट्टे पाटील या दोन भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली आहे.यामध्ये वासुदेव काळे यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघाची प्रामुख्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी निवडणूक लढवली होती. त्या देखील दौंड तालुक्यातूनच होत्या आणि वासुदेव काळे हे देखील दौंड तालुक्यातील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रामाणिकपणे व सचोटीने काम करणारे केडर मधील कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

विधानसभेसाठी अनेकदा ते इच्छुक होते मात्र पक्षाने दरवेळेस त्यांना संधी दिली नाही. राजकीय दृष्ट्या अन्याय होऊन देखील वासुदेव काळे यांनी भूमिका न बदलता निष्ठेने पक्षासोबत राहून काम केले. त्याचेच पारितोषिक म्हणून आता त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अजित पवार हे थेट भाजपमध्ये दाखल न होता राष्ट्रवादीचे म्हणून त्यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न अजित पवार निश्चितपणे करणार यात शंका नाही, त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वासुदेव काळे यांना देखील मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे हे उघड आहे.

Ajit Pawar, Vasudev Kale
BJP News : पुणे ग्रामीण बारामती शहराध्यपदी वासुदेव काळे, तर पुणे मावळ शहराध्यपदी शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती

अजित पवार यांच्यासारख्या ताकदीच्या नेत्या पुढे काम करताना व त्यातही भाजपचे मित्र पक्ष म्हणून त्यांचे कामकाज सुरू असताना वासुदेव काळे यांना संघटनात्मक काम करून गावोगाव कार्यकर्त्यांचे जाळे उभारणे हे आव्हान पेलावे लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय राजकीय गणिते होतात हे अद्याप अस्पष्ट आहे.

या लोकसभा मतदारसंघाची लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच कायम झाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारतीय जनता पक्षाने वासुदेव काळे यांच्यासारख्या एका मितभाषी व कार्यकर्त्यांचे संघटन असलेल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपविली आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये वासुदेव काळे यांना जिल्ह्यामध्ये फिरून पक्ष संघटना वाढीचा प्रयत्न करावा लागणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय होण्यासाठी थेट दिल्ली पासून जोरदार तयारी सुरू असल्याने काळे यांचे पक्षातील स्थान आता अधिक बळकट होणार हे निश्चित आहे .

Ajit Pawar, Vasudev Kale
Shankar Jagtap appointed Pimpri BJP president : पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती

पक्ष संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत असल्यामुळे यापुढील काळात त्यांच्यावर अधिक व्यापक जबाबदारी दिली जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. एकीकडे अजित पवार यांचे जिल्ह्यावरील वाढते वर्चस्व आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक विस्तार अशी दुहेरी कसरत वासुदेव काळे यांना आगामी काळात करावी लागणार आहे.

वासुदेव काळे ज्या दौंड तालुक्यातून येतात त्या दौंड तालुक्यातच राहुल कुल यांच्यासह राष्ट्रवादीचे नेतृत्व मानणारे रमेश थोरात, वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार यासारख्या स्थानिक नेत्यांशी देखील या युतीमुळे कसे जुळवून घेणार व पक्ष संघटना व विस्तार कसा करणार ही एक वेगळी कसरत देखील त्यांना करावी लागणार आहे.

अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला असला तरी पक्ष म्हणून पक्षाची ताकद बारामती लोकसभा मतदारसंघात वाढविण्याच्या दृष्टिकोनातून वासुदेव काळे यांना आगामी काळामध्ये भरीव काम करावे लागणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com