Rahul Shewale : महिलेच्या गंभीर आरोपांनंतर खासदार शेवाळेंच्या पत्नी सरसावल्या!

राहुल शेवाळे यांनी लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
MP Rahul Shewale News, Kamini Shewale News
MP Rahul Shewale News, Kamini Shewale NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहे. लग्नाचे आमिष दाखवून शेवाळे यांनी फसवणुक केल्याची तक्रारही पोलिसांकडे केली आहे. पण अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. गुन्हा दाखल न केल्यास आत्महत्येचा इशाराही महिलेनं दिला आहे. त्यानंतर आता राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी या पतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. (MP Rahul Shewale Latest News)

कामिनी शेवाळे यांनी महिलेच्या तक्रारीवर आपली भूमिका स्पष्ट केलं आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहे. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या 25 वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे, असं आरोप कामिनी शेवाळे यांनी केला आहे.

MP Rahul Shewale News, Kamini Shewale News
Shiv Sena News : राहुल शेवाळेंना मिळणार 'गिफ्ट'? शिंदे पंतप्रधान मोदींकडे शब्द टाकणार

संबंधित महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असून याविरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल होती. याची दखल घेऊन 11 जुलै 2022 रोजी सदर महीलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदविण्यात आली आहे. यानुसार सदर महिलेविरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला आहे.

महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तिला सुमारे 80 दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती असल्याचा दावाही शेवाळे यांनी केला आहे.

MP Rahul Shewale News, Kamini Shewale News
President Election : शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना दिलं मत

खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय आणि सामजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी विनंती कामिनी शेवाळे यांनी माध्यमांना केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com