President Election : शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना दिलं मत

राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच विरोधक एकत्र आले होते.
Sharad Pawar Latest Marathi News
Sharad Pawar Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार, हे आता जवळपास निश्चित आहे. कारण एनडीएतील पक्षांसह विरोधकांमधील अनेक आमदारांनीही त्यांना मत दिल्याचे स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीसाठी देशभरातील विरोधक ज्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच पक्षातील दोन आमदारांनीही क्रॉस वोटिंग केलं आहे. त्यामुळे पवारांनाही धक्का बसला आहे. (Sharad Pawar Latest Marathi News)

विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली. शरद पवारांच्या दिल्लीतील घरीच विरोधक एकत्र आले होते. पवारांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली होती. पण प्रत्यक्षात मतदानावेळी काँग्रेससह राष्ट्रवादी व इतर विरोधी पक्षातील काही आमदारांनी मुर्मू यांना मतदान केल्याचे समोर आले आहे.

Sharad Pawar Latest Marathi News
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; ठाकरेंना धक्का देत सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी केली जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष व आमदार कमलेश सिंह आणि गुजरातमधील पक्षाचे आमदार कंधाल जडेजा यांनी मुर्मू यांना मतदान केले आहे. मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. याविषयी बोलताना सिंह म्हणाले, मुर्मू यांनी झारखंडमधील लोकांसाठी काम केले आहे. तसेच माझेही त्यांच्याशी वैयक्तिक संबंधित आहेत. माझ्या मतदारसंघात जवळपास नऊ हजार आदिवासी मतं आहेत. (Presidential Election News)

जडेजा यांनीही पहिल्यांदाच असं क्रॉस वोटिंग केलेले नाही. राज्यसभा निवडणुकीवेळी त्यांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केलं होते. त्यावेळी त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. मुर्मू यांना मत दिल्याचे जाहीर करताना जडेजा म्हणाले, मला गुजरातमध्ये राहायचे आहे. माझ्या मतदारसंघातील विकासकामे लक्षात घेऊन मी त्यांना मतदान केलं. यामागे माझा कोणताही वैयक्तिक हेतू नाही, असंही जडेजा यांनी स्पष्ट केलं आहे.

Sharad Pawar Latest Marathi News
Congress : भाजप नेत्यांचं भाकित खरं ठरलं; मुर्मूंना मत दिल्याचं काँग्रेस आमदारांनं केलं जाहीर

दरम्यान, ओडिशातील काँग्रेसचे (Congress) आमदार मोहम्मद मुकीम (Mohammed Moquim) यांनी आपण मुर्मू यांनाच मतदान केल्याचे उघडपणे सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना मुकीम म्हणाले, 'मी काँग्रेसचा आमदार आहे. पण तरीही एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. आपल्या मातीसाठी काहीतरी करण्याचा विचार करून मी त्यांना मत दिलं.' मुर्मू या ओडिशाच्या असल्याने येथील आणखी काही लोकप्रतिनिधींनी त्यांना मतदान केलं असण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com