MU Senate Election :
MU Senate Election :Sarkarnama

MU Senate Election : आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाची कसोटी टळली; अमित ठाकरे यांचे लॉन्चिंग लांबणीवर

Mumbai University Election : ९ ऑगस्टला यासंदर्भात कार्यक्रम जाहीर करण्यात आला
Published on

Mumbai News : राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाही. त्यातच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका जाहीर झाल्या होत्या, पण अचानक याही निवडणुका रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळातही चर्चां सुरू झाल्या आहेत.

अशातच भाजपकडूनच निवडणुका टाळल्या जात असल्याचे बोलले जात आहे.या निवडणुकीचे परिणाम आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकीवर होऊ नये म्हणून भाजपमधील धुरणीकडून ताकही फुंकून पिले जात असल्याचे समजते. या निवडणुका स्थगित केल्याने ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्नाची कसोटी टळली तर मनसे नेते राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचे लॉन्चिंग लांबणीवर पडले आहे.

MU Senate Election :
Mumbai University Senate Elections : आदित्य ठाकरे-अमित ठाकरे भिडणार ; मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कस लागणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चर्चेची ठरलेली आज अर्थात १८ ऑगस्ट रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना आदल्या दिवशी रात्री उशीरा यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं. मुंबई विद्यापीठातील १० सिनेट सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली. एक आठवड्यापूर्वी म्हणजेच ९ ऑगस्टला यासंदर्भात कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत मतदार नोंदणीत युवसेनेच्या ठाकरे गटाने आघाडी घेतल्याची चर्चा होती. या दहा जागांसाठी ठाकरे गटाची युवासेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात अर्जही भरणार होते.

तर दुसरीकडे छात्र भारती विद्यार्थी संघटनेने राखीव प्रवर्गातील पाच व खुल्या प्रवर्गातील दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. पण तरीही सगळ्यांमध्ये शिंदे गटाच्या भूमिकेबाबत अस्पष्टता होती.त्यामुळे हा स्थगितीचा निर्णय घेतला असावा अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

MU Senate Election :
Nawab Malik News : नवाब मलिकांचं अखेर ठरलं : साहेब की दादा ? ; मलिक म्हणाले, "मी...'

या निवडणुकीसाठी सर्वच विद्यार्थी संघटनांनी कंबर कसली होती. मात्र यामध्ये ठाकरे गटाची युवा सेनेने काहीसी आघाडी घेतली होती. त्यासोबतच मनसेची विद्यार्थी सेना यांनी मतदार नोंदणीसाठी जोरकसपणे प्रयत्न करीत होती. त्यामुळे या दोन संघटनांमध्येच हा थेट सामना होईल असेच वातावरण होते. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत या दोन्ही संघटना व त्यांचे नेते, अर्थात आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

या मध्ये सत्ताधारी पक्ष मागे पडतील व त्याचा थेट परिणाम आगामी काळात होणाऱ्या महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर होणार असल्याने सत्ताधारी मंडळींकडून गेल्या कशी दिवसापासून निवडणुकाला सामोरे जाणे टाळले जात आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट असून कागदावर स्ट्रॉंग असणारा सत्तधारी पक्ष विपरीत निकाल येण्याच्या भीतीने निवडणुकाला सामोरे जाणे टाळत आहे. या निकालाचे परिणाम आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर होऊ नये यासाठी ताकही फुंकून पित आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com