Aaditya Thackeray : 'मुख्यमंत्र्यांचे मित्र, कंत्राटदार अन् बिल्डर्सना मेट्रोची कामं'; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Aaditya Thackeray On Mumbai Metro Lines : आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Metro Lines : 'गेल्या दोन-तीन दिवसांतल्या ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्या आपल्या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या आहेत. जे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो, तेच सत्य होतं. आणि सत्याचा आज विजय झालेला आहे. हे आता दोन बातम्यांवरून समोर आलं आहे', असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी आज 'मातोश्री'वर पत्रकार परिषद घेतली.

Aditya Thackeray
Sharad Pawar News : शाळेत गौतमी पाटीलचं नृत्य; पवारांनी 'महायुती'च्या 'कंत्राटी' धोरणाची केली चिरफाड

'आरेचं जंगल वाचावं, हा आमचा हेतू'

'मुंबई मेट्रो-६ च्या कारडेपोचं काम कांजूरमार्गला या वर्षापासून सुरू होत आहे. कांजूरमार्गच्या जागेवर आम्ही इंटिग्रेटेड कारडेपो करत होतो. त्या जागेवर मेट्रो मार्ग ६, ३, ४ आणि मेट्रो मार्ग १४ म्हणजे मुंबईतले दोन मार्ग आणि एमएमआर रिजनमध्ये जाणारे दोन मार्ग या एकाच जागेवर कारडेपोतून आम्ही इंटिग्रेट करणार होतो, पण तेव्हा केंद्र सरकारने आधी त्या जागेवर हक्क सांगितला; मग कोणीतरी बिल्डर आणला आणि त्या प्रकरणात त्याला घुसवलं होतं. वातावरण दूषित होऊ नये म्हणून आम्ही त्यावेळी कारडेपो आरेमधून कांजूरमार्गला हलवला होता. आमचं सरकार पाडल्यानंतर खोके सरकार आलं. आणि या सरकारने पहिला निर्णय घेतला तो कारडेपो कांजूरमार्गवरून आरेला नेण्याचा. यात आमचा कुठलाही अहंकार नव्हता किंवा वैयक्तिक वादही नव्हता. आम्हाला त्यातून काही मोबदला मिळणार आहे, असंही नव्हतं. आरेचं जंगल वाचावं, हा आमचा हेतू स्वच्छ होता. महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही आरेचं ८०८ एकर जंगल घोषित केलं. यानंतर जंगलाचा अभ्यास केला होता. तिथे ५ बिबटे राहत असल्याचं समोर आलं, पण हे सरकार आल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल यांनी मान्य केलेला नाही', असं आदित्य ठाकरे म्हणाले.

१० हजार कोटी वाचले असते - आदित्य ठाकरे

'तिसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. पर्यावरणाचा मुद्दा तुम्ही बाजूला ठेवला तर हे चार डेपो जेव्हा एकत्र करतो तेव्हा त्यासाठी जागा घ्यायला लागणार आहे. मेट्रो-६ साठी कांजूरमार्गची जागा होती आणि आता तिथेच काम होणार आहे. त्याच जागेवर मेट्रो-३ चं कारशेड करणार होताे. आता मेट्रो ४ आणि मेट्रो १४ साठी दोन जागा विकत घ्याव्या लागणार आहेत, पण आमच्या निर्णयामुळे जनतेचे १० हजार कोटी वाचले असते. कारण दोन ते अडीच हजार कोटी प्रत्येक कारडेपोवर खर्च झाला, तर ९ ते १० कोटी कारडेपोसाठी जागा विकत घेण्यातच जातात. ठाणे जिल्ह्यात त्या जागा कोणी घेतल्यात कोणाला त्यात फायदा होणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांचे किंवा त्याच्या आजूबाजूचे लोक आहेत का? यात मी जाणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटिग्रेटेड कारडेपो करत असताना महाराष्ट्राचे पैसे वाचले असते. आणि दुसरं म्हणजे ४ कोटी जनता ही एका इंटिग्रेटेड डेपोतून कनेक्ट झाली असती', असं आदित्य यांनी सांगितलं.

'प्रशासनावर कुठलीही पकड नसताना राज्यात घटनाबाह्य मुख्यमंत्री कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत. त्यात त्यांचे मित्र, कंत्राटदार आणि बिल्डर्सही असू शकतात, पण चार जागा चार वेगळ्या डेपोसाठी म्हणजे चार कंत्राटदारांना काम आणि मग त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी परत कंत्राट काढायचं म्हणजे अजून चार जणांना वेगळं काम दिलं जाणार. या कंत्राटात आपल्या राज्याचं हित कोणी पाहत नाही', असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

'कांजूरमार्गची जागा महाराष्ट्र सरकारचीच आहे, हे आम्ही सांगितलं होतं. तिथे हे चार कारडेपो एकत्र आणणार होतो. त्यावेळी केंद्र सरकारने केस केली होती. ही जागा आमची आहे असं केंद्र सरकारने म्हटलं होतं, पण महाराष्ट्र भारतातच आहे ना. एका व्यक्तीच्या किंवा काहींच्या अहंकारापोटी तुम्ही आमची अडवणूक करत होता. त्यातही मेट्रो ३ मध्ये ५० टक्के भागीदारी ही केंद्र सरकारची आहे; मग तुमचं भांडण नक्की कोणाबरोबर होतं? महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात एवढा द्वेष का? महाराष्ट्र आणि मुंबईविरोधी तुम्ही का वागता?' असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aditya Thackeray
Chhagan Bhujbal News : 'हो, मी दोन वेळा खोटं बोललो'; कबुली देत भुजबळांचं पवारांना प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com