जुई जाधव-
Maharashtra Politics Latest News : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेल्या शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या मार्गावर टोल आकारण्याची चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाचे आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर त्या मार्गावर टोल घेऊ नका, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शिवडी-न्हावाशेवा या मार्गावर किती टोल आकारायचा, ही चर्चा केली जाणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसणार की जास्तीचा टोल बसणार? हे पाहावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर Aaditya Thackeray यांनी ट्विट करीत
काय आहे ट्विट?
रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना शेजारच्या आवडत्या राज्यात पाठवल्यानंतर, किमान MTHL टोल फ्री ठेवा. आज मंत्रिमंडळ MTHL साठी टोलबाबत निर्णय घेऊ शकते. पण महाराष्ट्राने टोल का भरावा? त्यांच्या गलिच्छ राजकारणासाठी पैसे का द्यावे? आणि आपल्या शेजारचे (गुजरात) राज्य त्यांचे आवडते आहे. इच्छा नसतानाही उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना तिथे जाण्यास का भाग पाडले जात आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
MTHL, दिघा रेल्वेस्थानक आणि उरण लाईनच्या उद्घाटनाची तारीख अद्याप जाहीर का झाली नाही? असे ट्विटमध्ये म्हणत आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांवर उत्तर देत पलटवार केला आहे. ज्यावेळेला ते मंत्रिमंडळात होते, त्यावेळेला त्यांनी पाणबुडीचा प्रकल्प का आणला नाही?, असे मंत्री केसरकर म्हणाले. त्यांचे सरकार ज्यावेळेला होते, त्यावेळेला त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता. आता फक्त त्यांना बातम्यांमध्ये राहायचे आहे, असा टोला पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लगावला आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.