Thackeray vs Shinde : शिंदेंचे मंत्री उदय सामंतांना 'उद्योग' पेलवेना? आदित्य ठाकरेंनी अधिकचं बोलणं टाळलं!

Aaditya Thackeray On Uday Samant : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या उद्योगमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
Uday Samant, Aaditya Thackeray
Uday Samant, Aaditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : मुंबईतील १७ हजार कोटींचा हिरे व्यापार सुरतला जात असल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसह मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता. आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉनचा मुद्दा उपस्थित करत उद्योगमंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केलं आहे. उदय सामंतांना खातं सांभाळता येत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

Uday Samant, Aaditya Thackeray
Sanjay Raut News : PM मोदींचं शरद पवारांवरील वक्तव्य म्हणजे विकृती; संजय राऊतांची बोचरी टीका

उद्धव ठाकरेंमुळे अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले, असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. त्यानंतर आता सामंत आणि ठाकरेंमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखे हजारो कोटींचे उद्योग यांनी गुजरातला पाठवले. त्यामुळे गुजरातच्या उद्योगमंत्र्यांना आम्ही उत्तर देणार नाही. काहींवर जास्त भाष्य करत नाही कारण त्यांना आपलं खातंही सांभाळता येत नाही. यामुळे कशाला त्यांच्यावर अधिक बोलायचं, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्र तीन वर्षे परकीय गुंतवणुकीत मागे गेला होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणण्यात आम्ही यशस्वी झालो. टीका करण्यापेक्षा आपण सरकारमध्ये असताना काय नक्की झालं आहे. हे जनतेला माहिती आहे. मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.

Uday Samant, Aaditya Thackeray
Sanjay Raut On Fadnavis : फडणवीस 'पुन्हा येणार' असतील तर स्वागतच.. ; संजय राऊतांचे 'सूचक' वक्तव्य!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com