Aaditya Thackeray : दावोसच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत दलाल; आदित्य ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Eknath Shinde Davos Tour : मुख्यमंत्री शिंदे दावोसला 50 कर्मचारी नेत असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप
Aaditya Thackeray, Eknath Shinde
Aaditya Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांना पुन्हा लक्ष्य केले आहे. गेल्या वेळी मुख्यमंत्र्यांनी 28 तासांसाठी 40 कोटींचा खर्च केला होता, तर या वेळी तब्बल 50 कर्मचारी घेऊन जात आहेत, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

राज्यात परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दावोस दौरा निश्चित झाला आहे. यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यात सोबत दलालांना घेतल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Konkan Politics: ठाकरे गटाची कोकणात जोरदार मोर्चेबांधणी; आमदार साळवींचा मंत्री सामंतांना सूचक इशारा

मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे दुसऱ्यांदा दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. या वेळी ते सोबत 50 कर्मचारी, आणि काही पत्रकारदेखील नेणार आहेत, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

आधी 50 खोके आता 50 लोक

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर '50 खोके'ची घोषणाबाजी करण्यात आली. आता 50 लोकांना घेऊन दावोस दौरा केला जाणार आहे. दावोस दौऱ्यासाठी केवळ 10 जणांना परवानगी दिली गेली आहे, मग इतरांना परवानगी कोणी दिली, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. इतर 50 लोक गाडी ढकलायला किंवा बॅगा उचलण्यासाठी मुख्यमंत्री नेत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दावोसच्या दौऱ्यात दलाल

दरम्यान, मुख्यमंत्री दलालांना दावोस दौऱ्यात घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दावोस दौरा तर मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री करतील. मात्र, इतर लोक सहलीला जाणार आहेत का, हा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षेनेत्यांचीदेखील टीका

50 लोकांचा ताफा सोबतीला आणि त्यांचा 34 कोटींचा खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री दावोसला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. इतके करून महाराष्ट्रात गुंतवणूक येणार का? की केंद्रात बसलेल्या महाशक्तीच्या ताकदीने उद्योग गुजरातमध्ये जाणार? महाराष्ट्रातील जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत तिथे राज्याच्या हिताची किती कामे होतील?

दौऱ्याचा एकूण खर्च बघता हा दावोस दौरा सरकारच्या मर्जीतील अधिकारी, नेते आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळींच्या पर्यटनासाठी आहे का, असे प्रश्न उत्तर विरोधी पक्षनेत्यांनी केले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरेंच्या 'सफाई'चा शिंदेंनी हिशोब चुकता केला; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com