Thackeray Group : आदित्य ठाकरेंचे मुंबई महापालिका आयुक्तांना खडे सवाल; निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर

Aaditya Thackeray Letter To Bmc Commissioner : आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या प्रश्नांवरून महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे...
Aaditya Thackeray, CM Eknath Shinde
Aaditya Thackeray, CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Politics News : मुंबई महापालिकेत रस्त्यांच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आता आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांच्या कामावरून थेट मुंबई महापालिकाचे प्रशासक आणि आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून आदित्य ठाकरे यांनी चहल यांना रस्त्यांच्या कंत्राटावर काही प्रश्न विचारले आहेत. यासोबतच चहल यांना विनंती करत सल्लाही दिला आहे. आपल्या पत्रावर खोटी आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे उत्तरे देऊ नका, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aaditya Thackeray, CM Eknath Shinde
Uddhav Thackeray Big Claim : शिंदे सरकारच्या काळात 8 हजार कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा काय ?

आदित्य ठाकरेंचे महापालिका आयुक्तांना सवाल

> दक्षिण मुंबईतल्या रस्त्यांच्या कामात घोटाळ्यामुळे निलंबित केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले का? असेल तर ही माहिती सार्वजनिक करावी आणि इतर राज्यांना आणि शहरांना माहिती द्यावी. संबंधित कंत्राटदाराने त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी दंड भरला आहे का?, असे सवाल आदित्य ठाकरेंनी केले आहेत.

भ्रष्टाचार आणि घोडाळ्यामुळे कंत्राटदाराला निलंबित केल्यावर त्याला जबाबदार असलेल्या रस्ते विभागाचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त चौकशीला सामोरे जाणार का? दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी नव्या कंत्राटदाराची निवड कधी करणार? घोटाळा झालेल्या कामांची सध्याची स्थिती काय आहे? रस्त्यांची कामे पाहण्यासाठी मुंबईपालिकेने सीसीटीव्ही आणि सार्वजनिक डॅशबोर्ड बसवले आहेत का? असे तिखट सवाल आदित्य ठाकरेंनी केले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी चहल यांच्यासह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील साडेआठ हजार कोटींच्या कामे खोळंबली आहेत. खोक्यांसाठी खोके सरकारकडून दबवा येत आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करू. तसेच ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत तिथे घोटाळे सुरू असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्य सरकारव निशाणा साधला.

Aaditya Thackeray, CM Eknath Shinde
Datta Dalvi News : आमच्यात शिवसेनेचे रक्त, समोरचे भ्याड; जामिनावर सुटताच दळवींचा बाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com