Uddhav Thackeray Big Claim : शिंदे सरकारच्या काळात 8 हजार कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा काय ?

Shivsena Vs Mahayuti Government : ...हा पैसा कोणाच्या खिशात गेला त्याचा शोध घेतला पाहिजे.
Uddhav Thackeray Big Claim
Uddhav Thackeray Big ClaimSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे कोसळलेले दर यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या सगळ्या परिस्थितीत सरकारी मदतीकडे शेतकरीराजा डोळे लावून बसला आहे, पण ही मदत मिळणं तर दूरच पण राजकीय आरोप - प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू आहे. महायुती सरकारने एक रुपयात पीकविमा ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

या योजनेवरूनच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारच्या काळात 8 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यामुळे पुन्हा महायुती विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Big Claim
Datta Dalvi News : आमच्यात शिवसेनेचे रक्त, समोरचे भ्याड; जामिनावर सुटताच दळवींचा बाण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.नया पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी प्रश्वांव समस्येवरून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे म्हणाले, पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे का? अशी शंका मला येऊ लागली आहे. कारण एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नावाने राज्य सरकार (State Government) ने पीक 8 हजार कोटी रुपये विम्याच्या बोडक्यावर घातले असल्याचा आरोप करत सरकारवर कोरडे ओढले.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने एवढे हजारो कोटी पीक कंपन्यांना दिल्यावरही त्यांची कार्यालये बंदच आहेत. कोणी फोन घेत नाही, कुणाकडून दाद मिळत नाहीत. ते सरकारचं ऐकत नाही आणि शेतकऱ्यांना सामोरेही जात नाहीत. त्यामुळे हा पैसा त्या कंपन्यांच्या नावाने कोणाच्या खिशात गेला त्याचा शोध घेतला पाहिजे. कारण हा पैसा करदात्यांचा पैसा आहे. शेतकऱ्यांना किती पैशांचे मदत मिळाले पाहिजेत आणि किती रुपयांचे चेक मिळत आहेत, ते बघायला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकांचे पीक कर्ज फेडण्यासाठी आपले किडनी डोळे, लिव्हर असे अवयव विक्रीला काढले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपले अवयव खरेदी करण्याची विनंतीही या शेतकऱ्यांनी केली होती. यानंतर शुक्रवारी या शेतकऱ्यांनी मुंबईत जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर ताशेरे ओढले.(Farmers)

या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, आता ठाकरेंनी पंचनाम्याचा खेळ थांबवा आणि सरसकट कर्जमाफी द्या, अशी मोठी मागणी करत अवयव विक्रीचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांना धीर दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray Big Claim
Ajit Pawar Vs Sanjay Raut : संजय राऊतांचा विषय अजितदादांनी एका सेकंदातच संपवला; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com