Abu Azmi on the way to NCP : सपाला मुंबईत धक्का; अबू आझमी अजितदादांना ताकद देणार ?

Maharashtra Lok Sabha Constituency : आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत. मुंबई येथील मानखुर्द, शिवाजीनगर या मतदारसंघाचे ते आमदार..
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार महायुतीच्या माध्यमातून केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने केला आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 45 जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीत सहभागी असलेल्या भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केला आहे.

यासाठी विविध प्रकारच्या राजकीय योजना तयार केल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आपली बाजू बळकट करण्यासाठी विरोधी पक्षातील इच्छुकांना पक्षात प्रवेश देण्याबरोबरच विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर टीकेची झोड उठविण्यास सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दहा महिन्यांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हक्क अजितदादा पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा नवीन पक्ष अस्तित्वात आला आहे. शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

त्यातच आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी बदलती राजकीय गणिते लक्षात घेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आझमी यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काही बैठका झाल्या असून, त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आझमी यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abu Azmi
Jitendra Awhad News : सलमाननंतर जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगचे टार्गेट, लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षाचे नेते आझमी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास अजित पवार यांची ताकद वाढणार आहे. आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत. मुंबई येथील मानखुर्द, शिवाजीनगर या मतदारसंघाचे ते आमदार आहेत. या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विजयी झालेले आहेत. तसेच राज्यसभेचे ते खासदारदेखील राहिलेले आहेत. महाराष्ट्रात समाजवादी पक्ष वाढविण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. अशा स्थितीत आझमी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्याचा फायदा मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पवार यांना होऊ शकतो.

आझमी यांच्या पाठीशी मुस्लिम मतदार अधिक आहे. मुंबईमधील (Mumbai) मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मोठ्या संख्येने त्यांना आहे. मुंबईत आणि विशेषत: ईशान्य मुंबईच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवाराला अबू आझमी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशीदेखील अबू आझमी यांची राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित झाली नाही. ते राष्ट्रवादीमध्ये कधी प्रवेश करतात, यावर अनेक गणिते अवलंबून आहेत.

R

Abu Azmi
CM Eknath Shinde : आपल्याच खासदारांना उमेदवारी देऊ न शकणारे मुख्यमंत्री शिंदे 'रिंगमास्टर' कसे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com