Abu Azmi on Khulatabad renaming : ''...तर मी म्हणतो एका जागेचंच नाही संपूर्ण देशाचं नाव बदला, आम्ही स्वागत करू'' ; अबू आझमींचं मोठं विधान!

Abu Azmi statement : खुलताबादचं नाव रत्नपूर करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर अबू आझमींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे ; जाणून घ्या, आणखी नेमकं काय म्हणाले आहेत?
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

Abu Azmi latest reaction : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. ही कबर हटवली गेली पाहीजे असं काहींचं म्हणणं आहे तर काहींच्या मते ही कबर राहू द्यावी. त्यात आता कबरीचं ठिकाण असलेल्या खुलताबाद या गावाचं नाववही बदलून रत्नपूर केलं जावं, अशी मागणी समोर येवू लागली आहे. भाजप अन् शिवसेना नेत्यांकडून तशी विधानं केली गेली आहेत. यावर आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

या मुद्य्यावर मीडियाला प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले, ''पुराने शहरो के नाम बदलनेसे क्या होगा, सरकार कोई नया शहर बसाओ तो बात बने. माझं म्हणणं आहे की जर नाव बदलण्याने महागाई संपत असेल, नाव बदलण्याने बेरोजगारी संपत असेल, नाव बदलण्याने जर देशातील कायदा अन् सुव्यवस्था सुधारत असेल तर मी म्हणतो की एकाच जागेचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदलला आम्ही स्वागत करू.''

Abu Azmi
PMC notice to Dinanath Hospital : अखेर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पुणे महापालिकेने बजावली नोटीस; दोन दिवसांत जर...

याशिवाय अबू आझमींनी पुढे म्हटले की, ''पण नाव बदलण्याचा अर्थ आहे, की तुम्ही लोकांना चुकीच्या पद्धतीने यामध्ये गुंतवून तुम्ही देशातील महागाई, देशाच्या भूभागावर चीनने किती मोठ्याप्रमाणावर कब्जा केलेला आहे, लाडक्या बहिणीस २१०० रुपये देवू म्हणणाऱ्यांकडे तिजोरीत पैसे नाहीत. जर या गोष्टींवरून लोकांचे लक्ष विचलीत करायचे असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे.''

तसेच ''देशात विकासावर बोललं गेलं पाहीजे. ते प्रत्येक काम करा ज्यामुळे बंधुभाव वाढेल. ज्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण होईल, देशात सर्वजण मिळून राहतील, असं मला वाटतं.'' असं मत अबू आझमी यांनी सांगितलं.

Abu Azmi
Petrol-Diesel Price : केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय! , आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार?

याशिवाय, ''इतिहास तर सांगितला गेलाच पाहीजे, इतिहास मिटवला जाऊ शकत नाही. खरा इतिहास लोकांना दाखवला पाहीजे. बनावट इतिहास बनवू नका, जे योग्य ते लोकांना दाखवा आणि जबरदस्ती देशात अशी गोष्ट आणू नका, ज्यामुळे सामाजिक तणाव वाढेल व कायदा, सुव्यवस्था बिघडेल.'' असंही मत अबू आझमींनी व्यक्त केलं.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com