Sharad Pawar News : पवारांनी राजीनामा तर दिला; पुढे काय? 'यांना' मिळू शकते संधी...

Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar Retirement News : राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड आज (ता. २ मे) घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या आग्रहावरुन शरद पवार यांनी दोन-तीन दिवस विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे.

पवार यांनी पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. कार्यकर्त्यांनी तर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर धरणे धरले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांची भावना पवार यांच्या कानावर घातली. त्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पवार यांची भूमिका सांगितली. पुढील दोन तीन-दिवसात साहेब आपल्या निर्णयावर फेर विचार करुन भूमिका मांडतील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar
Sharad Pawar resigns as NCP chief : साहेब निर्णय मागे घ्यावा; शरद पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे साताऱ्यात आंदोलन

मात्र, पवार यांची भूमिका काय असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये काय घडामोडी घडू शकतात, यावर राजकीय जाणकरांनी अनेक शक्यता व्यक्त केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार (Sharad Pawar) आपली भूमिका बदलून ते अध्यक्ष राहू शकतात. तसेच कार्यकारी अध्यक्षांची निवड करु शकतात. त्या पदावर सुप्रिया सुळे, अजित पवार किंवा सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची नियुक्ती होऊ शकते. किंवा इतर नावही समोर येईल.

कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे. त्याचा विचार करता पवार हे अध्यक्ष पदावर काय राहून काही नेत्यांवर सामूहीक जबाबदारी देऊ शकतात. किंवा पूर्ण पणे बाजूला होऊन, नवीन अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. पवार फक्त त्यांना मार्गदर्शन करतील, अशा अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. पवार यांनी पदावर कायम राहावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे सर्व नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, पवार यांच्या पदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयावर शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठलशेठ मणियार यांनी मोठे भाष्य केले आहे. पवार यांच्या निर्णयावर मणियार यांनी 'साम टिव्ही'शी संवाद साधला. त्यामध्ये ते म्हणाले, ''साहेबांना पुन्हा एकदा कॅन्सरचा त्रास झाला. त्यातून ते बरे झाले. तो प्रश्न नव्हता, मात्र, वाढते वय त्यानंतर बदलेली राजकीय परिस्थिती यामुळे त्यांना जो एक ताण योतोय, त्या ताणातून त्यांना आता थोडीशी विश्रांती मिळावी, यासाठी त्यांनी जी सामाजिक कामं उभी केली आहेत. त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. अनेक माणसं त्यांनी राजकारणात उभी केली आहेत.''

Sharad Pawar
IAS Tukaram Mundhe News : सरकार कुणाचेही असो; मुंडेंसारखा कार्यक्षम आधिकारी नकोसा का वाटतो? पुन्हा साईड पोस्टींगच !

''राष्ट्रवादीची एक संपूर्ण टीम त्यांनी तयार केली आहे. राष्ट्रवादीत (NCP) अनेक नेते आहेत, अध्यक्षपदासाठीही माणूस तयार होईल. साहेबांनी चांगली टीम तयार केली आहे. आम्हाला मित्रांना सुद्धा वाटत होते, की त्यांनी आता थांबवले पाहिजे. त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांमध्ये काम करता यावे, आणि त्यामध्ये त्यांना अधिक चांगले काम करता येईल.''

पवार यांनी विचार करुन निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक नाही, पण कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. ते इतर कामांमध्ये स्वता: गुंतवून घेतील. नवीन माणूस तयार होण्यासाठी अधिक वेळ मिळेल. राजकारणामध्ये निवृत्तीची वेळ सांगितली जात नाही. त्यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर चर्चा होणार आहे. मात्र, कधीतरी थांबावे लागणारच आहे,'' असे मणियार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com